Join us

हिंदी सिनेसृष्टीतील सालस, सोज्वळ नटी! अभिनयासह सौंदर्यानं चाहत्यांना लावलेलं वेड, कुठे गायब झाली 'विवाह'मधली पूनम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:05 IST

1 / 8
'अब के बरस' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता राव.
2 / 8
बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून अमृताची ओळख आहे. आपल्या सुंदर अभिनयानं अमृतानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
3 / 8
'विवाह', 'मैं हूं ना', तसेच 'ईश्क विश्क', 'मस्ती' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयची दखल घ्यायला भाग पाडलं.
4 / 8
सध्या अमृता लाइमलाईटपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
5 / 8
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना २०१६ मध्ये तिने आरजे अनमोलसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती सिनेविश्वापासून थोडी दुरावली.
6 / 8
आजकालच्या ऑन स्क्रीनच्या डिमांड्स पटत नसल्याने, तिने निवडक भूमिका करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.
7 / 8
अमृता रावने २०१९ मध्ये आलेल्या 'ठाकरे' या सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली होती.
8 / 8
लवकरच ही अभिनेत्री 'जॉली एलएलबी- ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
टॅग्स :अमृता रावबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा