Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकाच शाळेत शिकायचे 'हे' सेलिब्रिटी; लहानपणीच जमली गट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 15:22 IST

1 / 8
श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ- शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा आणि जॅकी श्रॉफ यांचा मुलगा एकाच वर्गात शिकायचे. मुंबईतल्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं. याच शाळेत टायगरची बहीण कृष्णा श्रॉफचं शिकत होती.
2 / 8
आर्यन खान आणि नव्या नवेली- शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली लंडनच्या एका शाळेत शिकले आहेत. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.
3 / 8
आथिया शेट्टी आणि कृष्णा श्रॉफ- नव्वदचं दशक गाजवणाऱ्या सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ यांचं शिक्षण एकाच शाळेत झालं आहे. याच शाळेत श्रद्धा कपूरचंदेखील शिक्षण झालं.
4 / 8
अवंतिका मलिक आणि रणबीर कपूर- इम्रान खानची पत्नी अवंतिका आणि रणबीर कपूर एकाच शाळेत होते. बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यावेळी या दोघांमधलं नातं मैत्रीच्या पुढे गेलं होतं. ते एकमेकांना डेट करत होते. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही.
5 / 8
ऋतिक रोशन आणि उदय चोप्रा- इयत्ता चौथीपासून ऋतिक रोशन आणि उदय चोप्रा एकाच वर्गात होते. या दोघांमध्ये उत्तम मैत्री आहे. वाईट काळातही त्यांनी एकमेकांना खंबीरपणे साथ दिली आहे.
6 / 8
ट्विंकल खन्ना आणि करण जोहर- अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि दिग्दर्शक करण जोहर एकाच शाळेत शिकायचे. एका बोर्डिंग स्कूलमध्ये या दोघांचं शिक्षण झालं. करण जोहरनं त्याच्या पुस्तकाचा याचा उल्लेखदेखील केला आहे.
7 / 8
सलमान खान आणि आमीर खान- बॉलिवूडच्या तीन खानांपैकी सलमान आणि आमीर एकाच वर्गात होते. इयत्ता दुसरीत ते एकत्र होते. मात्र एक वर्षच हे दोघे एकत्र शिकले. या वर्षभरात कधीच त्यांचा एकमेकांशी संवाद झाला नाही.
8 / 8
अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचं शालेय शिक्षण साक्षी सिंह धोनीसोबत झालं आहे. या दोघी आसामच्या सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकायच्या.
टॅग्स :अनुष्का शर्मारणबीर कपूरश्रद्धा कपूरटायगर श्रॉफहृतिक रोशनआमिर खानसलमान खान