Join us

महादेवावर अपार श्रद्धा असलेले बॉलिवूड स्टार्स; काहींनी गोंदवला महादेवाचा टॅटू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:36 IST

1 / 9
बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार शीवभक्त आहेत. काहींनी तर आपल्या शरीरावर महादेवाचे टॅटूही गोंदवलेत.
2 / 9
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये माता कौशल्याची भूमिका साकारणाऱ्या इंदिरा कृष्णा महादेवच्या भक्त आहेत. त्या म्हणतात की, आध्यात्मिक साधना नकारात्मकतेला दूर ठेवते.
3 / 9
दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली कंगना राणौत देखील शिवभक्त भक्त आहे. ती अनेकदा धार्मिक स्थळांना भेट देते आणि पूजा करते.
4 / 9
बॉलिवूडचा 'बाबा' संजय दत्तचीही (Sanjay Dutt) महादेवर खूप श्रद्धा आहे. त्याने डाव्या खांद्यावर शिवाचा टॅटू आणि संस्कृतमध्ये ओम नमः शिवाय देखील गोंदवून घेतलं आहे.
5 / 9
हृतिक रोशन हा देखील मोठा शिवभक्त आहे. तो अनेकदा शिव मंदिरांत पुजा करताना पाहायला मिळाला आहे.
6 / 9
अभिनेत्री रवीना टंडनची (Raveena Tandon) महादेवार अपार श्रद्धा आहे. 'केदारनाथ ते रामेश्वरम' पर्यंत सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन तिनं घेतलंय.
7 / 9
बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगण (Ajay Devgn) देखील भगवान महादेवाचा एक भक्त आहे. अजयनेही आपल्या अनेक चित्रपटांमध्ये महादेवावरील श्रद्धा व्यक्त केली आहे. अजय देवगणच्या छातीवर गोंदवलेला महादेव आणि त्रिशूल यांचा टॅटू त्याच्या श्रद्धेचा पुरावा आहे.
8 / 9
'देवों के देव महादेव' या मालिकेमध्ये सती, दक्षिणायनी आणि महादेवीची भूमिका साकरणारी मौनी रॉय ही खऱ्या आयुष्यातही शिवभक्त आहे. ती नेहमी शिव मंदिरात जाते.
9 / 9
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेते. याचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सारानं अमरनाथलाही जाऊन दर्शन घेतलं होतं.