Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shanelle Arjun Reception: स्मृती इराणींच्या मुलीच्या रिसेप्शनला पोहोचला शाहरुख खान! या स्टार्संनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:39 IST

1 / 7
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शानेल इराणी यांच्या रिसेप्शनला बड्या स्टार्सनी हजेरी लावली.
2 / 7
या पार्टीत शाहरुख खान, मौनी रॉय, एकता कपूर आणि रवी किशनसारखे स्टार्संनी हजेरी लावली.
3 / 7
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शानेल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला अनेक स्टार्संनी हजेरी लावली. अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांनी नवविवाहित जोडप्यासोबत जोरदार पोज दिली.
4 / 7
स्मृती इराणी यांच्या मुलीच्या रिसेप्शनला बॉलिवूडचा किंग खाननेही हजेरी लावली. रिसेप्शनमध्ये शाहरुखने काळा फॉर्मल सूट परिधान केला होता.
5 / 7
मौनी टीव्ही शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' चा भाग आहे. रिसेप्शनमध्ये हिरव्या रंगाची साडी परिधान करून मौनी खूपच सुंदर दिसत होती. मौनीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना शानेल आणि अर्जुनचे अभिनंदन केले आहे.
6 / 7
रवी किशन आणि रोनित रॉय यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली. रोनित रॉय आणि स्मृती इराणी यांनी 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मध्ये एकत्र काम केले आहे.
7 / 7
यावेळी स्मृती इराणी यांची बेस्ट फ्रेंड आणि निर्माती एकता कपूरही रिसेप्शनला पोहोचली. एकता कपूर तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत पोहोचली.
टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानस्मृती इराणी