By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 20:56 IST
1 / 9Yami Gautam Shocking Revelation: यामी गौतम ही एक अतिशय लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही अभिनेत्री म्हणून केली होती. टीव्हीवरील मोठ्या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली.2 / 9टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून नाव कमावल्यानंतर मात्र यामी गौतमला बॉलिवूड चित्रपटात संधी मिळाली. अभिनेत्री आयुष्मान खुरानासोबत 'विकी डोनर' या चित्रपटातून तिने बॉलिवूड पदार्पण केले.3 / 9यामी गौतम ही एक अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारच्या वादात अडकली नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही चर्चा झाली नाही. यामी गौतम एक आदर्श अभिनेत्री मानली जाते.4 / 9पण यामी गौतमने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका भयंकर प्रकाराबद्दल सांगितले, ज्यामध्ये एका मुलाने तिच्याशी अतिशय 'घाणेरडे' कृत्य केले आणि त्या घटनेचा तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला.5 / 9प्रत्येक व्यक्तीला आपली स्वत:ची प्रायव्हसी महत्त्वाची असते. अभिनेत्री यामी गौतमने 'सेलेब्स प्रायव्हसी ब्रीच' बद्दल बोलताना रोखठोक मत मांडले आणि त्याच वेळी तिने तिच्यासोबत घडलेली एक अतिशय वाईट आणि किळसवाणी घटना सांगितली.6 / 9यामी गौतम मुलाखतीत म्हणाली, 'माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे की अनेक लोकांनी मला न विचारता तिचा फोटो क्लिक केला आहे किंवा माझा व्हिडिओ बनवला आहे. पण मी कुठे आहे, काय करते आहे याबद्दल प्रत्येकाने माझ्या मताचा आदर करायला हवा. कारण काही वेळा या गोष्टींचा प्रचंड मनस्ताप होतो.'7 / 9यामी गौतम पुढे म्हणाली- 'हिमाचल प्रदेशमध्ये मी माझ्या मूळ गावी गेले होते. मी जेव्हा माझ्या गावी जाते तेव्हा माझ्याशी बोलायला किंवा मला भेटायला जे लोक येतात, त्यांनी मी फोटो किंवा व्हिडीओ काढू नका असं सरळ सांगून टाकते.'8 / 9'पण एकदा एका मुलाने मात्र कहरच केला. तो मुलगा अवघ्या १९-२० वर्षांचा होता. मी माझ्या गावी शेतामध्ये होते. त्याचवेळी त्या मुलाने माझ्या टीमला, माझा फोटो क्लिक करण्याची विनंती केली आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने कॅमेरा सुरू केला, पण पुढे त्याने मला न विचारता काही वेगळंच केलेलं दिसलं.'9 / 9'अचानक त्या मुलाने माझा व्हिडिओ शूट करायला सुरूवात केली. इतकेच नव्हे तर तो व्हिडीओ थेट ऑनलाइन व्हायरल केला आणि स्वत:च्या व्लॉगवर अपलोड केला. तो व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला. जेव्हा अशा प्रकारे कुणी आपला व्हिडीओ किंवा फोटो क्लिक करत असतं, त्यावेळी मला त्यांनी विचारायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे,' असे यामी गौतम म्हणाली.