Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची सौंदर्यवती, अजय देवगणसोबत केलंय काम! स्वत:च्या नावापुढे लावत नाही वडिलांचं नाव, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 15:11 IST

1 / 8
नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे तब्बु. अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याच्या आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तब्बू त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायची.
2 / 8
तब्बूचा चाहतावर्ग फार मोठा आहे. अभिनेत्रीचे मुळ नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असे आहे. हटके भूमिका आणि चित्रपटांच्या बाबतीत धाडसी निर्णय, यामुळे तब्बू नेहमीच चर्चेत राहिली आहे. तीन दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत तिने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3 / 8
वयाच्या ११ व्या वर्षी तब्बूने १९८२ साली आलेल्या 'बाजार' या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती, ती तिच्या सिनेमॅटिक कारकिर्दीची सुरुवात होती. त्यानंतर तिने विजयपथ, माचिस ,चांदनी, अंधाधून अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांमधून अभिनय केला. तिने विजयपथ सिनेमात अजय देवगणसोबत काम केलेलं काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पडद्यावर तिची आणि अजय देवगणच्या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.
4 / 8
या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सांगितलं होतं की, आजवर ती आपल्या वडिलांना कधीच भेटलेली नसून ती स्वतच्या नावामागे वडिलांचें आडनावही वापर नाही.
5 / 8
या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सांगितलं होतं की, आजवर ती आपल्या वडिलांना कधीच भेटलेली नसून ती स्वतच्या नावामागे वडिलांचें आडनावही वापर नाही.
6 / 8
सिमी गरेवालला यांना दिलेल्या जुन्या मुलाखतीत, तब्बूने हैदराबादमधील तिच्या बालपणाबद्दल सांगितलं होतं, ती म्हणाली, 'माझे बालपण खूप छान गेले. आम्ही माझे संपूर्ण आयुष्य हैदराबादमध्ये घालवले. माझ्या आईवडिलांच्या घटस्फोटानंतर, मी माझ्या आजी-आजोबांसोबत राहत होते. माझी आई शिक्षिका होती आणि मी माझा बहुतेक वेळ माझ्या आजीसोबत घालवला.'
7 / 8
तब्बू ही अशा कुटुंबातून येते जिथे कलेचा वारसा आहे. तिची मोठी बहीण फराह १९८० च्या दशकात चित्रपटांमध्ये मात्र, तरीही तब्बू तिच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्धीपासून खूप दूर होती.
8 / 8
त्याचदरम्यान,तब्बूने तिच्या वडिलांचे आडनाव का लावत नाही, हे स्पष्ट केलं.अभिनेत्री म्हणाली, 'मला माझ्या वडिलांचं आडनाव वापरणं कधीही आवश्यक वाटलं नाही. तबस्सुम फातिमा असं माझं नाव आहे. शाळेच्या दाखल्यावर माझं नाव फातिमा असं होतं.' मला ते आठवत नाहीत. माझी बहीण त्याला अधूनमधून भेटली आहे, पण मला त्याला भेटता आलं नाही.' असं तब्बू म्हणाली होती.
टॅग्स :तब्बूबॉलिवूडसेलिब्रिटी