Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर नटी! ३६ वर्षे 'या' अभिनेत्रीने स्वत:ला खोलीत कैद ठेवलेलं, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:11 IST

1 / 7
आपल्या अलौकिक सौंदर्याने आणि आकर्षक अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःचं स्थान निर्माण करणारी ही नायिका प्रसिद्ध बंगाली कवी रजनीकांत सेन यांची नात होती. वयाच्या १५ व्या वर्षी १९४७ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती आदिनाथ सेन यांचा मुलगा दिबानाथ सेन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. रमा दासगुप्ताची सुचित्रा सेन झाली.
2 / 7
सुचित्रा सेन यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाला. त्यांचा पहिला चित्रपट 'शेष कोथाय' कधीही प्रदर्शित झाला नसला तरी यातील त्यांच्या उल्लेखनीय अभिनय कौशल्याने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली.
3 / 7
त्यानंतर मग निर्मल डे यांचा 'शेर चुअटोर' हा चित्रपट आला. यात त्यांना उत्तम कुमार यांच्यासोबत अभिनय साकारला होता. उत्तम-सुचित्रा या जोडीला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली. पुढील २० वर्षे या जोडीने बंगाली तिकीटबारीवर केवळ बंगालीच नव्हे तर जगभरातील लोकांच्या हृदयावर राज्य केलं.
4 / 7
हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 'देवदास', 'बंबई का बाबू' आणि 'सरहद' या चित्रपटातून 'देव आनंद', अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं.
5 / 7
१९७८ मधील प्रणय पाशा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. तसे पहायला गेले तर पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी चित्रपटातून अभिनय करणे बंद केले होते. मात्र शेवटचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे निवृत्ती घेतली.
6 / 7
सुचित्रा सेन यांनी स्वतःला घरात नजरकैदेत ठेवले.निवृत्तीनंतर त्यांनी रामकृष्ण मिशनमध्ये काम करण्यावर लक्ष केंद्रित केले. १९७९ पासून सुचित्रा सेन यांनी सार्वजनिक जीवनातूनही निवृत्ती घेतली. त्यावेळीही सुचित्रा सेन यांना चित्रपटांच्या ऑफर येत होत्या, पण त्यांनी त्या सर्व चित्रपटांना नकार दिला आणि स्वतःला त्या खोलीत कोंडून घेतलं. जेव्हा त्यांना बाहेर जावे लागायचे, तेव्हा त्या चेहरा पूर्णपणे झाकून जायच्या आणि मृत्यूच्या वेळीही त्यांचा चेहरा कोणीही पाहिला नव्हता.
7 / 7
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी