Join us
Daily Top 2Weekly Top 5

'खून भरी मांग' मध्ये रेखा यांना दिली टक्कर, उंचीमुळे फ्लॉप झालं करिअर, हॉटेल व्यावसायिकाशी संसार थाटला पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:58 IST

1 / 8
सौंदर्य स्पर्धांतून चित्रपटसृष्टीतून येणाऱ्या अभिनेत्रींनी रुपेरी पडदा गाजवला आहे.मात्र,यातील प्रत्येकीला यश मिळालंच असं नाही.१९८५ च्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेतून विजेती अभिनेत्री सोनू वालिया हिचा आज जन्मदिवस.सौंदर्य स्पर्धेतून येऊन तिने थेट रुपेरी पडद्यावर तिने पाऊल ठेवलं.
2 / 8
सोनू वालियाने 'खून भरी मांग' या सिनेमामध्ये काम केलं होतं. या सिनेमातून तिला लोकप्रियता मिळाली. यानंतर तिनं जवळपास ३५ सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या.
3 / 8
त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. सोनू वालिया आजही 'खून भरी मांग', 'हातिम ताई', 'खेल' , 'प्रतिकार', 'थलपती', 'तहलका'आणि 'दिल आशना है'या चित्रपटांतील तिच्या भूमिकांसाठी ओखळली जाते.
4 / 8
सोनू वालियाचा जन्म १९ फेब्रुवारी १९६४ रोजी नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. तिचे वडील मेजर सतिंदर वालिया हे भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि आई सतेंद्रकौर वालिया या गृहिणी होत्या.
5 / 8
सोनू वालियाने मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८५ मध्ये मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.सौंदर्य स्पर्धेतून चित्रपटसृष्टीतील प्रवेश सोपा झाला. १९८६ मध्ये केतन आनंद यांच्या 'शार्ट' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
6 / 8
मात्र, राकेश रोशन यांच्या 'खून भरी मांग'या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. या चित्रपटात अभिनेत्री थेट रेखा यांना टक्कर दिली होती.
7 / 8
रुपेरी पडद्यासह तिने छोट्या पडद्यावर 'बेताल पचीसी' आणि 'महाभारत कथा' यासारख्या काही दूरचित्रवाणी मालिकांमध्येही अभिनय केला आहे. एका मुलाखतीत स्वत: अभिनेत्रीने सांगितलेलं की, तिला तिच्या उंचीमुळे सिनेमात काम मिळालं नाही.' तिची उंची ५ फूट ८ इंच आहे. सोनू ८०-९० च्या दशकातील सर्वात उंच अभिनेत्री होती.
8 / 8
वैयक्तिक आयुष्यात सोनू वालियाने अमेरिकेतील हॉटेल व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते सूर्यप्रताप सिंग यांच्याशी विवाह केला. त्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. २०१० मध्ये तिच्या पतीचे निधन झालं. सध्या अभिनेत्री मुंबईत राहते.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी