1 / 9बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज ८ जून रोजी तिचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 / 9कर्नाटकात १९७५ साली जन्मलेली शिल्पा आज केवळ अभिनेत्रीच नव्हे तर यशस्वी उद्योजिका आणि फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखली जाते.3 / 9शिल्पाने आपल्या करिअरची सुरुवात एका लिम्का कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीने केली होती. त्यानंतर १९९३ मध्ये 'बाजीगर' या सुपरहिट चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पाऊल टाकले आणि पहिल्याच चित्रपटातून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.4 / 9पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अख्खे जग जिला शिल्पा म्हणून ओळखलं जातं असलं तरी तिचं नाव वेगळंच आहे. 5 / 9शिल्पा शेट्टीचं खरं नाव 'अश्विनी' होतं. मात्र, तिच्या आईने ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार तिचं नाव बदलून 'शिल्पा' ठेवलं . हे नावच तिच्या यशाचं कारण ठरलं.6 / 9अंकशास्त्रानुसार अश्विनीपेक्षा 'शिल्पा' हे नाव तिच्या करिअरमध्ये उपयोगी ठरेल असं त्या म्हणाल्या होत्या. म्हणून मनोरंजनसृष्टीत यायच्या आधी तिने शिल्पा शेट्टी नाव लावायला सुरुवात केली.7 / 9शिल्पाबद्दल अनेकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे ती ती कधीच स्वतः गाडी चालवत नाही. हेच कारण आहे की शिल्पा जिथे जाते तिथे तिचा ड्रायव्हर नेहमीच सोबत असतो.8 / 9 ९०च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शिल्पा शेट्टी आजही तितकीच लोकप्रिय आहे. 9 / 9अलिकडेच तिचा 'सुखी' सिनेमा रिलीज झाला होता, ज्याचं खूप कौतुक झालं होतं.आता तिचे चाहते शिल्पाला नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.