Join us
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत असायची अभिनेत्री, वयाच्या ४४ व्या वर्षी सुटलं व्यसन; आता बिग बॉसच्या घरात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:11 IST

1 / 9
९० च्या दशकात एका गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीने सर्वांनाच प्रेमात पाडले होते. 'सडक','दिल है के मानता नही' सिनेमातून तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं. ती अभिनेत्री म्हणजे पूजा भट (Pooja Bhatt). महेश भट यांच्या मुलीने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि तिच्यामागे कॉन्ट्रोव्हर्सीही लागली.
2 / 9
44 वर्षीय पूजा भटने बऱ्याच वर्षांनी स्क्रीनवर कमबॅक केलंय. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये सहभाग घेत तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पूजाने बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे.
3 / 9
पूजाने सायरस ब्रोचा आणि इतर सदस्यांसोबत बातचीत करताना पूजाने तिच्या आयुष्यातील अनेक खुलासे केले. दारुच्या व्यसनामुळे तिचं करिअर कशाप्रकारे उद्धवस्त झालं हे तिने सांगितलं.
4 / 9
पूजा म्हणाली,'मला दारु प्यायची सवय होती. मी हे सर्वांसमोर मान्य केलं आहे. तसंच हे व्यसन सोडायचं असा निश्चयही मी केला. भारतात महिला दारु पीत असेल तर तिच्याकडे वाईट नजरेने बघितले जाते.
5 / 9
हेच जर पुरुषांना दारुचं व्यसन असेल तर ते खुलेआम यावर बोलतात. त्यातून बाहेर पडताना ते कधीच विचार करत नाहीत की समाज काय म्हणेल. पण महिला खुलेआम दारु पीत नाहीत म्हणूनच त्या खुलेआम दारुचं व्यसन सोडवूही शकत नाहीत.
6 / 9
मी मात्र जगासमोर न लाजता दारु प्यायचे. म्हणूनच मला दारुचं व्यसन लागलं ही गोष्ट मी स्वीकारली. आणि त्याचप्रकारे दारु सोडण्याचीही गोष्ट सर्वांसमोर मान्य केली. मला लपूनछपून बरं व्हायचं नव्हतं.
7 / 9
बिग बॉसमध्ये घरातील इतर सदस्यांशी बोलताना पूजा म्हणाली, 'लोकं मला शराबी म्हणायचे पण मी ठीक होणारी शराबी होते. मी काही वर्षांपूर्वीच दारु पिणं सोडलं.'
8 / 9
पूजा भट इतरही काही कारणांनी वादात अडकली होती. वडील महेश भट यांच्यासोबतचा तिचा एक फोटो मासिकात छापून आला होता ज्यामध्ये बापलेक चक्क लिपलॉक करताना दिसत होते. पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असतं असं वादग्रस्त विधान महेश भट यांनी केलं होतं.
9 / 9
कॉन्ट्रोव्हर्सी आणि व्यसन यामुळे पूजा भट इंडस्ट्रीमधून गायब झाली. सध्या ती दिग्दर्शिका, निर्माती म्हणून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. शेवटचं तिला 'सडक 2' सिनेमात बघितलं गेलं.
टॅग्स :पूजा भटबॉलिवूडबिग बॉस