Join us

डिट्टो आईची कॉपी! ‘फूल और कांटे’ फेम मधुच्या लेकीला पाहिलंत का? निवडलंय फारच वेगळं क्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:41 IST

1 / 8
बऱ्याचदा स्टार किड्स त्यांच्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवतात. परंतु असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांनी अभिनय क्षेत्रात नाहीतर दुसऱ्या प्रोफेशनला पसंती दिली. अशाच एका अभिनेत्रीच्या मुलीबद्दल जाणून घेऊया...
2 / 8
आपलं सौंदर्य आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे मधु.
3 / 8
अभिनेत्री मधुने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. परंतु, यशाच्या शिखरावर असताना तिने अचानक बॉलिवूडला रामराम केला आणि सिनेविश्वापासून काही काळ लांब राहिली.
4 / 8
मधुने साल १९९९ मध्ये उद्योगपती आनंद शाह यांच्यासोबत लग्न केलं. मधु आणि आनंद यांना अमाया आणि किया नावाच्या दोन मुली आहेत.
5 / 8
अभिनेत्री मधुने तिच्या लेकींना लाईमलाईटपासून कायम दूर ठेवलं. त्यात अलिकडेच अभनेत्रीला तिची धाकटी लेक कियासोबत स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे सगळीकडे कियाची चर्चा होऊ लागली आहे.
6 / 8
दरम्यान, आई अभिनेत्री असली तरी कियाला मात्र या क्षेत्रात करिअर करायचं नाही. किया फक्त २२ वर्षांची आहे. University College London सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते.
7 / 8
परंतु, कियाला अभिनेत्री व्हायचं नाही. तिला बिझनेसमध्ये प्रचंड रुची आहे.
8 / 8
किया कप केकचा बिझनेस सांभाळते, असा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.
टॅग्स :मधूबॉलिवूडसेलिब्रिटी