Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रीतील पहिली ग्लॅमरस अभिनेत्री! हेमा मालिनी अन् रेखा यांच्या स्टारडमला द्यायची टक्कर, शेवट डोळे पाणावणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 16:01 IST

1 / 7
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणून अभिनेत्री परवीन बॉबी यांना ओळखलं जातं.७० आणि ८० च्या दशकात आलेल्या अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांची नायिका असलेल्या परवीन यांचा जन्म जुनागड गुजरात येथे एका मुस्लिम परिवारात ४ एप्रिल १९४९ साली झाला.
2 / 7
त्यांचे पूर्वज गुजरातमधील पठाण होते आणि बॉबी राजवंशांशी त्यांचा नातेसंबंध होता. आई वडीलांची एकुलती एक मुलगी असलेली परवीन यांचा जन्म त्यांच्या लग्नानंतर १४ वर्षांनी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर साल १९७२ मध्ये परवीन यांचे मॉडेलिंग करियर सुरु झाले.
3 / 7
मॉडेल म्हणून प्रसिध्दी मिळत असतांनाच त्यांना क्रिकेटर सलीम दुरानी यांच्यासोबत चरित्र या चित्रपटात काम करण्याची पहिली संधी मिळाली. हा चित्रपट फ्लॉप झाला पण परवीन यांना हिंदी चित्रपटसृष्टीची कवाड उघडली गेली.अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजबूर हा त्यांच्या करियरमधील पहिला हिट चित्रपट होता.
4 / 7
१९७६ मध्ये ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी परवीन टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकल्या होत्या. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणाऱ्या परवीन पहिल्य़ा भारतीय अभिनेत्री होत्या. खासगी आयुष्यात त्या खूप बोल्ड आणि बिनधास्त असल्याचं म्हटलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवासात त्यांना गंभीर भूमिकांपेक्षा ग्लॅमरस भूमिकाच जास्त मिळाल्या. त्याकाळातील फॅशन आयकॉन म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात असे.
5 / 7
परवीन बॉबी यांनी फैशनमध्ये आधुनिकता आणली, असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.त्याकाळातील हेमामालिनी, रेखा, जीनतअमान, जया बच्चन, रीना रॉय, राखी यांच्यासोबतच परवीन बॉबी यांचे नाव अग्रगण्य नायिकांमध्ये होते.
6 / 7
पडद्यावर जितक्या धाडसी आणि बिनधास्त होत्या, तेवढ्या खासगी जीवनात खूप एकाकी होत्या. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी हिच्या आयुष्याचा अखेरचा काळ खूपच बिकट गेला. डॅनी, महेश भट्ट, कबीर बेदी सारख्या प्रसिध्द कलाकरांबरोबर त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्या असतानाही जीवनाच्या अखेरीस त्यांच्या नशिबी एकटेच रहाणे होते.
7 / 7
मुंबईतील एका अपार्टमेंटमध्ये त्या रहात असत. त्यांच्या दरवाज्यासमोर तीन दिवसांपासून आलेले दूध व वर्तमानपत्रे पडलेली पाहून शेजार्‍यांनी पोलिसांना बोलावले आणि पोलिसांकडून 22 जानेवारी 2005 ला मुंबईतील अपार्टमेंटमध्ये परवीन बॉबी यांनी एकांतवासात अखेरचा श्‍वास घेतला.
टॅग्स :परवीन बाबीबॉलिवूडसेलिब्रिटी