By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:54 IST
1 / 8बॉलिवूडची एक अशी हसीना जिने ७०चं दशक गाजवलं. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम डान्सरही होती. पण, एका कॉन्ट्रोव्हर्सीमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. 2 / 8या अभिनेत्रीचं नाव होतं मीनू मुमताज. मीनू यांचे वडील मुमताज अली एक डान्सर आणि अभिनेता होते. मात्र वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची जबाबदारी मीनू यांच्यावर येऊन पडली. 3 / 8वडिलांसोबत मीनूदेखील लाइव्ह शोमध्ये स्टेजवर डान्स करू लागल्या. त्यानंतर अवघ्या १३व्या वर्षी १९५५ साली त्यांनी सखी हकीम सिनेमातून पदार्पण केलं. 4 / 8१९५६ साली प्रदर्शित झालेल्या CID सिनेमाने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्या दिसल्या. 5 / 8मीनू यांचा मोठा भाऊ महमूद अलीदेखील एक प्रसिद्ध कॉमेडियन होते. हावडा ब्रिज या सिनेमात हे दोघे भाऊ-बहीण एकत्र दिसले होते. 6 / 8सिनेमातील 'गोरा रंग चुनरिया काली' या गाण्यात मीनू आणि त्यांचा भाऊ महमूद यांनी ऑनस्क्रीन रोमान्स केला होता. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 7 / 8त्यानंतर १९६३ साली सैयद अली अकबर यांच्याशी मीनू यांनी विवाह केला आणि बॉलिवूडला रामराम केला. काही काळानंतर त्या कॅनडा येथे वास्तव्यास होत्या. 8 / 8२००३ मध्ये त्यांची स्मृती गेली. तेव्हा त्यांच्या मेंदूत ट्युमर आढळला होता. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी मीनू मुमताज यांचं ७९व्या वर्षी निधन झालं.