Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील 'या' गोड मुलीला ओळखलंत? सिनेसृष्टीत येण्यापूर्वी बदललं नाव, आज बॉलिवूडवर करतेय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:12 IST

1 / 9
आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात.
2 / 9
अनेकदा सिनेविश्वातील हे कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियावर असे फोटो प्रचंड व्हायरल होतात.
3 / 9
अशातच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो समोर आला आहे. आज तिची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. चाहते तिच्या एका सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने वाट पाहतात. तुम्ही ओळखलात का ही कोण आहे?
4 / 9
दरम्यान, ही चिमुकली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आहे.
5 / 9
महाराष्ट्रातील मुंबई येथे ३१ जुलै १९९२ ला सिंधी व्यावसायिक जगदीप अडवाणी व जन्माने स्पेनिश व शिक्षिका असलेल्या आई जेनेविव जाफरी यांच्या कुटुंबात कियाराचा जन्म झाला.
6 / 9
कियाराचं खरं नाव आलिया असं होतं. लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न असणाऱ्या आलियाला तिच्या वडीलांनी ३ इडियट चित्रपट पाहिल्यानंतर अभिनयात करियर करण्याची परवानगी दिली. त्यानंतर तिने अनुपम खेर आणि रोशन तनेजा यांच्या अभिनय स्कूलमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
7 / 9
'एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून कियारा चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.या चित्रपटातील महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिची भूमिका मिळाली. या चित्रपटाने यश संपादन केल्यानंतर भारतीय सिनेरसिकांनी कियाराला लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवून दिलं.
8 / 9
चित्रपटसृष्टीत आधी आलिया भटचे आगमन झालेले असल्याने, कबीर सदानंद यांच्या फगली (२०१४) या चित्रपटातून पदार्पण करताना तिने आपले नाव आलिया बदलून कियारा केले. २०१९ मध्ये आलेल्या कबीर सिंह या चित्रपटातील कियाराने साकारलेली साधी भोळी प्रिती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटाने ती युवावर्गात फारच प्रसिध्द झाली.
9 / 9
वेगवेगळ्या चित्रपटातील तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून तिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाचे दर्शन घडविले. कियाराने त्यानंतर 'गुड न्यूज', 'लस्ट स्टोरीज' आणि 'शेरशाह' सारखे हिट चित्रपट केले.आता लवकरच ती 'टॉक्सिक'या सिनेमामध्ये दिसणार आहे.
टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्