Join us
Daily Top 2Weekly Top 5

पडद्यावर खेळाडूची भूमिका! खऱ्या आयुष्यात क्रिकेटरच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, धर्माच्या भिंती ओलांडून थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:54 IST

1 / 7
बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक नायिका आल्या ज्यांनी आपलं सौंदर्य आणि अभिनयाने लाखो चाहत्यांना भुरळ घातली. त्यातीलच एक नाव म्हणजे सागरिका घाटगे.
2 / 7
बॉलिवूडची या सुंदर अभिनेत्रीने करिअरमधील चित्रपटात'हॉकी खेळाडू'ची भूमिका साकारून खूप प्रसिद्धी मिळवली, पण खऱ्या आयुष्यात तिने एका दिग्गज क्रिकेटपटूसोबत संसार थाटला.
3 / 7
सागरिका घाटगेचा जन्म ८ जानेवारी १९८६ रोजी कोल्हापूर येथे झाला. सागरिका घाटगे ही राजघराण्यातील आहे असून कोल्हापूरचे शाहू महाराजांच्या वंशातील ती आहे. सागरिकाचे वडील विजयसिंह घाटगे हे कागलच्या राजघराण्यातील सदस्य होते.
4 / 7
'चक दे! इंडिया' चित्रपटातील प्रीती सबरवाल या भूमिकेमुळे सागरिका घाटगे आजही ओळखली जाते. हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुखसोबत तिने स्क्रिन शेअर केली.
5 / 7
सागरिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने भारताचा माजी फिरकीटपटू झहीर खानसोबत लग्नगाठ बांधली. त्यांनी २०१७ मध्ये कोर्ट मॅरेज केले. झहीर सागरिकापेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे.
6 / 7
२०२५ मध्ये क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे पालक झाले आहेत. सागरिकाने एका मुलाला जन्म दिला आहे.
7 / 7
फार कमी लोकांना हे माहीत असेल की, सागरिका एक हॉकी खेळाडू होती.मात्र, तिने या क्षेत्रात करिअर केलं नाही. एक उत्तम हॉकी खेळाडू असल्यामुळेच तिला चित्रपटात भूमिका मिळाली आणि या क्षेत्राचे दरवाजे तिच्यासाठी खुले झाले.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी