Join us

'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 20:58 IST

1 / 10
बॉलिवूड आणि ग्लॅमर यांच्यातील नाते अतूट असते. हल्लीच्या अभिनेत्री उत्तम अभिनयासोबतच फिटनेसवरही लक्ष देत असतात.
2 / 10
सध्या बॉलिवूडमध्ये अशाच एका 'फिटनेस फ्रिक' अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिचा फोटोशूट चांगलाच चर्चेत आहे.
3 / 10
ती अभिनेत्री म्हणजे बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात नाव कमावलेली आणि आता बॉलिवूड चित्रपटात चमकणारी अवनीत कौर (avneet kaur).
4 / 10
विराट कोहलीने अवनीत कौरच्या फॅन पेजवरील फोटोला लाईक केल्यामुळे तिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती.
5 / 10
विराटसारखीच फिटनेस फ्रिक असलेल्या अवनीतच्या फॉलोअर्समध्ये त्या दोन-तीन दिवसांमध्ये तुफान वाढ झाल्याचेही दिसले होते.
6 / 10
त्यानंतर अवनीत कौर आणखी एका कारणामुळेदेखील चर्चेचा विषय बनली होती. ते कारण म्हणजे हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ (tom cruise).
7 / 10
अवनीत कौर हिने काही दिवसांपूर्वी तरूणींच्या गळ्यातला ताईत असलेल्या टॉम क्रूझसोबत भेट घेऊन फोटो पोस्ट केला होता.
8 / 10
त्यानंतर आता अवनीत आपल्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे. अवनीतने जिम सेशनमधील काही फोटो, व्हिडीओ पोस्ट केल्यात.
9 / 10
अवनीत या जिम सेशन फोटोशूटमध्ये कमालीची फिट आणि तितकीच हॉट दिसतेय. तिचे फॅन्सदेखील तिच्या फिटनेसवर फिदा झालेत.
10 / 10
विशेष म्हणजे, बालकलाकार म्हणून अवनीतने सोज्वळ भूमिका केल्या. पण आता अवघ्या २३व्या वर्षी ती आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करतेय.
टॅग्स :अवनीत कौरबॉलिवूडफिटनेस टिप्सव्हायरल फोटोज्