Join us  

वीजबिलाचा आकडा पाहून बॉलिवूड कलाकार झाले होते घामाघुम; शाहरुख खानने हद्दच केली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 2:27 PM

1 / 10
बॉलिवूड स्टार्स प्रत्येक गोष्टीमुळे चर्चेत राहतात. बॉलिवूड स्टार्सच्या कपड्यांपासून ते जेवणापर्यंत सर्व काही खास आहे. या सगळ्याशिवाय स्टार्सची घरेही त्यांच्या किमतीमुळे चर्चेत असतात. पण आज तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या वीज बिलाबद्दल सांगणार आहोत. काहींचे बिल लाखात तर काहींचे हजारात. या यादीत सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खानपासून अनेक स्टार्सचा समावेश आहे.
2 / 10
या यादीत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या नावाचाही समावेश आहे. आमिर खान मुंबईत एका अपार्टमेंटमध्ये राहतो, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराचे बिल दर महिन्याला 9-11 लाख रुपये येते.
3 / 10
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचे वीज बिल सुमारे 20-25 लाख रुपये येते.
4 / 10
कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत 4BHK अपार्टमेंटमध्ये राहते. रिपोर्ट्सनुसार, या अपार्टमेंटचे वीज बिल 8-10 लाख रुपये येते.
5 / 10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक असलेले अमिताभ बच्चन यांची मुंबईत अनेक घरे आहेत. ते जुहू येथील एका बंगल्यात आपल्या कुटुंबासह राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराचे एका महिन्याचे बिल 20-22 लाख रुपये येते.
6 / 10
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा पती आणि अभिनेता सैफ अली खान मुंबईत एका आलिशान बंगल्यात एकत्र राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराचे वीज बिल 30-32 लाख रुपये येते.
7 / 10
रणवीर सिंगची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील तिच्या घराचे वीज बिल भरते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या 4BHK अपार्टमेंटचे वीज बिल 13-15 लाख रुपये येते.
8 / 10
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे घर मन्नत खूप चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराचे एका महिन्याचे वीज बिल 43 लाख रुपये आहे.
9 / 10
आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तापसी पन्नूचे वीज बिल 36 लाख रुपये आले होते. याबाबत तिने ट्विट केले होते.
10 / 10
पुलकित सम्राटनेही आपल्या घराच्या वीज बिलाबद्दल ट्विट केले आहे. त्याच्या घराचे वीज बिल 30 हजार रुपये आले होते.
टॅग्स :शाहरुख खानसलमान खानकतरिना कैफतापसी पन्नूआमिर खानदीपिका पादुकोणसैफ अली खान करिना कपूररणवीर सिंग