Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचा 'कर्नल चिकारा' आठवतोय? खलनायक साकारून हिरोंवर पडायचा भारी, अखेरच्या दिवसांत झाले हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:31 IST

1 / 8
हिंदी सिनेरसिकांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची फारशी क्रेझ नव्हती तेव्हा आलेला आणि प्रेक्षकांच्या स्मरणात असलेला एक चित्रपट म्हणजे प्रतिबंध. या चित्रपटातून अभिनेता चिरंजीवीची मुख्य भूमिका होती. मात्र, भाव खावून गेला होता तो खलनायक ‘स्पॉट नाना’ म्हणजेच अभिनेते रामी रेड्डी.
2 / 8
एकीकडे ९० च्या दशकात ॲक्शन चित्रपटांची चलती होती.याचकाळात नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेते रामी रेड्डी हे सिनेरसिकांचा आवडते खलनायक ठरले.
3 / 8
रामी रेड्डी यांचा जन्म १ जानेवारी १९५९ ला आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील वाल्मिकीपुरम गावात झाला. हैदराबाद येथे त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. आणि मास मीडिया (पत्रकारिता)मध्ये पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त होताच 'द मुन्सिफ डेली' या वृत्तपत्रासाठी पूर्णवेळ पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली.
4 / 8
एके दिवशी रामी रेड्डी प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक कोडी रामकृष्ण यांची मुलाखत घेण्यासाठी गेले, मुलाखतीदरम्यान रामी रेड्डी यांच्या व्यक्तिमत्त्वाने कोडी रामकृष्ण एवढे प्रभावित झाले की, त्यांनी त्यांना 'अंकुसम' (1989) या चित्रपटातील भूमिका ऑफर केली. या चित्रपटातील 'स्पॉट नाना' च्या भूमिकेने रामी रेड्डी यांना प्रसिद्धी मिळवून दिली.
5 / 8
'प्रतिबंध'च्या यशानंतर 'वक्त हमारा है' (१९९४) या चित्रपटात त्यांनी 'कर्नल चिकारा' या रहस्यमय 'क्रिप्टॉन बॉम्ब' ने भारताचा नाश करण्याची योजना आखणाऱ्या भयानक दहशतवाद्याची भूमिका साकारली.
6 / 8
दिलवाले (१९९४) या चित्रपटामध्ये रामी रेड्डी यांना एकही संवाद नव्हता पण केवळ रुपेरी पडद्यावरील त्यांची उपस्थिती आणि अभिनय यामुळे त्यांनी भीतीदायक खलनायक उभा केला होता.
7 / 8
पुढे रामी रेड्डी यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये 'वक्त हमारा है', 'खुद्दार' , ' एलान', 'शपथ', 'गुंडा' या गाजलेल्या चित्रपटांसाठी अभिनय केलाय. रामी रेड्डी यांनी तेलगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळमसह विविध भाषांमधील चित्रपटांत काम केलं.
8 / 8
२०१० मध्ये झालेल्या यकृत कर्करोगाच्या निदानामुळे, त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. उपचारादरम्यान वजन झपाट्याने कमी होवून भरभक्कम शरीरयष्टी असणारे रामी रेड्डींचे वजन जवळपास निम्मे झाले. कर्करोगाचा परिणाम यकृतासह त्यांच्या मूत्रपिंडांवरही झाला. कर्करोगाशी लढा सुरु असतांना दुर्दैवाने, रामी रेड्डी यांचे १४ एप्रिल २०११ ला वयाच्या ५२ व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झाले.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी