अभिनयासाठी केस कापले अन् वडिलांनी २० वर्ष धरला अबोला; 'बिग बीं' मुळे झाली नाराजी दूर, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:48 IST
1 / 8बॉलिवूडचा हॅण्डसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता अंगद बेदी सध्या चर्चेत आला आहे. अभिनेता अंगद बेदी भारताचे पूर्व क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. 2 / 8एका शीख परिवारात वाढलेल्या अंगदने इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधी त्याचे लांब केस कापण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीवरून अंगदच्या वडिलांनी त्याच्यासोबत २० वर्ष अबोला धरला. 3 / 8'सायरस सेज'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. त्यामध्ये अंगदने त्याच्या वडिलांची नाराजी अमिताभ बच्चन यांच्यामुळे दूर झाली,असं सांगितलं. 4 / 8पुढे अभिनेता म्हणाला, 'मला आठवतंय मी १८-१९ वर्षांचा असेन तेव्हा मी माझे केस कापले. वयाच्या ३३ व्या वर्षी मी 'पिंक' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. त्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आम्हाला दिल्लीला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी अमिताभ बच्चन माझ्या वडिलांसोबत बसले होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं, तुमचा मुलगा सिनेमासाठी बनला आहे. कापलेल्या केसांची चिंता करू नका'.5 / 8दरम्यान, अभिनेत्याने सांगितलं 'माझ्या वडिलांनी माझं कधीच कौतुक केलं नाही. पण, 'बिग बीं'सोबत बोलणं झाल्यानंतर ते खूप भावुक झाले. त्यानंतर ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले हे वाईट नाही आहे'. 6 / 8अंगदने २००४ साली 'काया तरण' या सिनेमाच्या मााध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 7 / 8त्यानंतर अंगद 'फालतू', 'उंगली, 'पिंक', 'डिअर जिंदगी', 'टायगर जिंदा है' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला.8 / 8२०१८ मध्ये तो अभिनेत्री नेहा धुपियासोबत विवाह बंधनात अडकला.