- म्हणून ट्विंकल खन्ना मुलांना पाहू देत नाही स्वत:चे रोमॅन्टिक सिनेमे, कारण ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 13:55 IST
1 / 10अभिनेत्री ट्विंकल खन्ना आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करतेय. ट्विंकल म्हणजे एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व. मनात येईल ते बेधडक बोलणारी. यामुळे ती अनेकदा ट्रोलही होते. पण म्हणून ट्विंकल बदलली नाही.2 / 10लग्नानंतर ट्विंकलने बॉलिवूडला रामराम ठोकला. त्याआधी तिने काही सिनेमे केलेत. पण हे सिनेमे ती कधीच तिच्या मुलांना बघू देत नाही. कारण काय तर तिला लाज वाटते.3 / 10होय, एका मुलाखतीत ट्विंकल यावर बोलली होती. माझ्या मुलांना मी माझे रोमँटिक चित्रपट बघू देत नाही. माझा मुलगा माझाच रोमँटिक चित्रपट पाहतो तेव्हा मला लाज वाटते, असे ती म्हणाली होती.4 / 10 आरव खूप खोडकर आहे. माझ्या जुन्या रोमँटिक सीनचा व्हिडिओ तो वारंवार पाहतो आणि माझी खिल्ली उडवतो, असेही तिने सांगितले होते.5 / 10 1996 सालच्या माझ्या ‘जान’ चित्रपटातील एक क्लिप आरव सतत पाहायचा. (ट्विंकल सहअभिनेत्याच्या छातीचे चुंबन घेत असल्याचा तो सीन होता.’ हद्द म्हणजे आरवने त्या सर्व सीन्सचा एकत्र कोलाज करुन मााझ्या एका बर्थ डे ला पाठवला होता, असा किस्साही तिने ऐकवला होता.6 / 10 ट्विंकलने 1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.7 / 10ट्विंकलचे फिल्मी करिअर फार मोठे नव्हतेच. मोजून तिने केवळ 17 चित्रपट केले आहेत. 8 / 102001 मध्ये ट्विंकलने अक्षय कुमारशी लग्न केले आणि यानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला.9 / 10अभिनयक्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर ट्विंकल लेखिका म्हणून नावारूपास आली. तिच्या नावावर अनेक सिनेमे आहेत.10 / 10‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’ हा ट्विंकलचा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर तिने लेखन, इंटिरियर डिझायनिंग या आपल्या आवडीच्या क्षेत्रावर सर्व लक्ष केंद्रीत केले.