1 / 10सोनम व आनंदची लव्हस्टोरी अफलातून आहे. खरे तर आनंद त्याच्या एका मित्रासोबत सोनमला डेटवर पाठवू इच्छित होता. त्यानिमित्तानेच दोघांची भेट झाली होती.2 / 10पण सोनमला पाहताच आनंद आपल्या मित्राला विसरला आणि स्वत:च सोनमच्या प्रेमात बुडाला.3 / 102014 मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेण्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे.4 / 10पहिल्या भेटीनंतर सोनम व आनंद एकमेकांच्या आणखी जवळ आलेत. रात्ररात्र दोघांच्या गप्पा सुरु झाल्यात.5 / 10महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले मे 2018 मध्ये दोघांनीही लग्न केले.6 / 10आनंद व सोनमने एकमेकांना डेट करणे सुरु केले, त्या दिवसांपासून बरोबर दोन महिन्यांनी सोनमचा वाढदिवस होता. 7 / 10सोनमच्या वाढदिवसासाठी आनंदने एक सरप्राईज प्लान केले. त्याने एक रेस्टॉरंट बुक केले आणि सोनमच्या आवडीचा मेन्यू, म्युझिक अशी सगळी जंगी तयारी केली.8 / 10सोनम रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आनंदने तिला त्याने हाताने लिहिलेले एक कार्ड गिफ्ट केले. सोनमसाठी हे सरप्राईज अविस्मरणीय ठरले. कारण यापूर्वी कुणीही कधीही तिच्यासाठी असे काही केले नव्हते.9 / 10आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. 10 / 10 आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे.