Join us

जानूच्या ‘बेफिक्रे’ जिम लुकवर चाहते फिदा...! पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 02:30 IST

1 / 11
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा आज वाढदिवस. जान्हवीच्या ग्लॅमरस फोटोंची चर्चा नेहमीच होते. पण तिच्या जिम लुकचीही चर्चा नेहमीच होताना दिसते.
2 / 11
ट्रॅडिशनल असो की वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये जानू सुंदर दिसते. तिचे जिम लूकचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
3 / 11
जीम लूकमध्ये जान्हवी नेहमी छोट्या शॉर्ट्समध्ये दिसते. या तिच्या छोट्या शॉर्ट्स पाहून कतरिना कैफने एकदा चिंता व्यक्त केली होती.
4 / 11
जान्हवीच्या खूप छोट्या शॉर्ट्स पाहून कधीकधी मला चिंता होते. ती माझ्यासोबत माझ्याच जिममध्ये येते. मी नेहमी पाहते. कधी कधी तिचे ड्रेस पाहून मला चिंता वाटते, असे कॅट एका मुलाखतीत म्हणाली होती.
5 / 11
जान्हवी फिटनेसबद्दल अतिशय क्रेजी आहे. अगदी एकही दिवस ती जिम चुकवत नाही.
6 / 11
चित्रपटाच्या शूटींगदरम्यान बिझी असूनही ती जिमला जाणे चुकवत नाही.
7 / 11
जान्हवीने ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
8 / 11
पहिल्याच चित्रपटानंतर जान्हवी स्टार बनली. आता ती जिथे जाईल तिथे कॅमेरे तिच्यामागे असतात.
9 / 11
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘रूही’ या सिनेमात दिसणार आहे.
10 / 11
याशिवाय कारगिल गर्ल या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.
11 / 11
दोस्ताना 2 या सिनेमातही ती झळकणार आहे.