1 / 11आज डिंपलचा वाढदिवस़ डिंपलचा जन्म 8 जून 1956 रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. 1973 मध्ये आलेल्या बॉबी या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.2 / 11 पहिल्याच चित्रपटाने ती एका रात्रीत स्टार झाली यावेळी डिंपल केवळ १६ वर्षांची होती. 3 / 11बॉबी रिलीज होण्याआधी डिंपलने राजेश खन्नासोबत लग्नगाठ बांधली होती. एकीकडे नवे नवे लग्न आणि दुसरीकडे ‘बॉबी’चे अपार यश असे सगळे अनुभवत असताना याचकाळात डिंपल यांच्याबद्दल एक अफवाही पसरली होती. 4 / 11 ती अफवा म्हणजे, डिंपल कपाडिया नर्गिस आणि राज कपूर यांनी अनौरस संतान असल्याची. डिंपल ही नर्गिस आणि राज कपूर यांची मुलगी आहे. त्यामुळे राज कपूर यांनी तिला ‘बॉबी’मध्ये लीड रोल दिला, अशी चर्चा त्यावेळी खूप रंगली होती.5 / 11डिंपल यांचा लूक नर्गिस यांच्या फिल्मी लूकशी बराच साधर्म्य साधणारा होता. त्यामुळेही या चर्चेला बळ मिळाले होते.6 / 11मीडियातील या चर्चेमुळे शाळेतील इतर मुले बोर्डिंगमध्ये शिकत असलेल्या संजय दत्तला टोमणे मारायचे. संजय दत्तला नर्गिस आणि डिंपल यांच्या नावावरुन चिडवायचे. या कारणामुळे संजय त्याची आई नर्गिस यांच्यावर नाराज राहू लागला होता.7 / 11अर्थात डिंपल यांच्याबद्दलची चर्चा निव्वळ अफवा असल्याचे लवकरच सिद्ध झाले. खुद्द नर्गिस यांनी यावर खुलासा केला.8 / 11एका मुलाखतीत नर्गिस यावर बोलल्या होत्या. या अफवा कशा उठल्या याबद्दल मला ठाऊक नाही. ‘बॉबी’तील डिंपलचा लूक माझ्या ‘आवारा’तील लूकशी मिळताजुळता आहे, त्यामुळे या कथा रचण्यात आल्या. अशा अफवा पसरवणे अतिशय मुर्खपणा आहे. देव न करो, पण जर असे घडले असते, तर मी माझ्या मुलीला नक्कीच स्वीकारले असते, असे त्या म्हणाल्या होत्या.9 / 11राज कपूर यांनी आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी ‘बॉबी’ या चित्रपटाची निवड केली आणि या चित्रपटात हिरोईन म्हणून डिंपल यांची वर्णी लागली होते.10 / 11 ‘बॉबी’ प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले होते.11 / 11 डिंपल नावाची ही नवी हिरोईन कोण, कुठली हे कळायच्या आधीच चाहते तिच्यासाठी अक्षरश: वेडे झालेत होते.