Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिपाशा बासूच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण! पती करण सिंग ग्रोव्हरवरचं प्रेम व्यक्त करत म्हणाली "देवाला माहीत होतं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:28 IST

1 / 10
बॉलिवूडची 'ब्लॅक ब्युटी' अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या लग्नाला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
2 / 10
३० एप्रिल २०१६ रोजी बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर हे दोघे विवाहबंधनात अडकले होते.
3 / 10
या खास निमित्ताने बिपाशाने सोशल मीडियावर पतीसोबतचे काही रोमँटिक आणि जुने फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
4 / 10
लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करताना बिपाशाने कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, 'सर्वात प्रेमळ माणसाबरोबरची आनंदाची १० वर्षे! देवाला माहीत होतं मला नेमकं काय हवंय'.
5 / 10
पुढे ती म्हणाली, 'माझं आयुष्य प्रेम आणि साधेपणाभोवती फिरतं. आयुष्यातले छोटे छोटे क्षण, लहान आनंद तू रोज आमच्या आयुष्यात भरतोस, त्यासाठी धन्यवाद. मी आणि आपली लेक देवी खूप भाग्यवान आहोत'.
6 / 10
बिपाशाने करणसोबतच्या या १० वर्षांच्या प्रवासाला 'Monkeyversary' असे गोंडस नाव दिले आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.
7 / 10
'अलोन' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
8 / 10
२०१६ मध्ये त्यांनी लग्न केलं लग्नाच्या ६ वर्षानंतर त्यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं. जिचं नाव त्यांनी देवी ठेवलं. बिपाशा अनेकदा तिचे फोटोही शेअर करत असते.
9 / 10
२००१ मध्ये 'अजनबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या बिपाशाने 'राज', 'जिस्म', 'धूम २', 'नो एन्ट्री' आणि 'रेस' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. तिने टेलिव्हिजनवर 'डर सबको लगता है' या शोचे सूत्रसंचालनही केले होते.
10 / 10
सध्या बिपाशा आपल्या कुटुंबाला वेळ देत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती कधी बॉलिवूडमध्ये कमबॅक करते, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर