सलमानच्या जवळची अभिनेत्री लग्नाआधी राहिली होती गर्भवती, विवाहित कुमार सानूंना केलं होतं डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:49 IST
1 / 9'बिग बॉस १९'ची धमाकेदार सुरुवात झाली असून सलमान खानच्या या शोमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. यापैकी एक महिला स्पर्धक तिच्या वादग्रस्त वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. 2 / 9ही स्पर्धक दुसरी-तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद आहे. कुनिकाचा बिग बॉसच्या घरात प्रवेश झाल्याने तिच्या आयुष्यातील अनेक जुन्या वादविवादांना पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.3 / 9अभिनेत्री कुनिका सदानंदने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. 4 / 9तिने सांगितले होते की, ती दुसऱ्या लग्नापूर्वी गर्भवती होती. तिचा पहिला पती अभय कोठारीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने दुसऱ्यांदा एका अमेरिकन पुरुषासोबत लग्न केले होते. तिला दुसऱ्यांदा लग्न करायचं नव्हतं. बाळाचा ती एकटीने संगोपन करणार होती. पण, वडिलांनी स्वीकार करण्यास नकार दिल्यानंतर लग्न केलं.5 / 9मात्र, तिचे दोन्ही विवाह अयशस्वी ठरले आणि दोघांसोबतही तिने घटस्फोट घेतला. आता 'बिग बॉस'च्या घरात ती तिच्या या वादग्रस्त आयुष्याबद्दल काय खुलासे करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.6 / 9कुनिका सदानंदचे लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत राहिले आहे. एकेकाळी प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि कुनिका यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. त्यावेळी कुमार सानू विवाहित होते, त्यामुळे या प्रकरणाने मोठा वाद निर्माण केला होता.7 / 9कुनिका सदानंदच्या फिल्मी करियर बद्दल बोलायचे झाल्यास १९८० तिने अभिनय करण्यास सुरुवात केला. मॉडेलिंगपासून सुरुवात केल्यानंतर चित्रपट आणि टीव्ही शो केले. १९८८ च्या कब्रिस्तान चित्रपटातून तिला पहिला ब्रेक मिळाला. 8 / 9त्यानंतर बेटा, खुदा गवाह, गुमराह, राजा हिंदुस्तानी, येस बॉस यासारख्या सिनेमांमध्ये सहकलाकाराच्या भूमिका साकारल्या. कुनिका नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाते. 9 / 9कुनिकाने सलमान खानसोबत 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'हम साथ साथ है' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे.