Join us

In Pics: नाम बडे और...! दिग्गज कलाकार आणि पाण्यासारखा पैसा खर्च करूनही फ्लॉप झालेत हे सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:58 IST

1 / 17
रूप की रानी चोरो का राजा - 1993 साली रिलीज झालेला अनिल कपूर व श्रीदेवी अशी सुपरहिट जोडी असलेल्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. पण हा सिनेमा तितकाच दणकून आपटला होता.
2 / 17
राजू चाचा - अजय देवगणच्या या सिनेमावर 25 कोटी रूपयांचा खर्च झाला होता आणि या सिनेमाने केवळ 8.5 कोटींची कमाई केली होती.
3 / 17
अशोका - शाहरूख खानच्या या सिनेमाचे बजेट होते 14 कोटी रूपये. सिनेमा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाने कसेबसे 10 कोटी कमावले.
4 / 17
राम गोपाल वर्मा की आग - 2007 साली रिलीज झालेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ‘शोले’चा रिमेक होता. अजय देवगण, अमिताभ बच्चन, मोहनलाल, सुश्मिता सेन असे दिग्गज कलाकार असूनही हा सिनेमा दणकून आपटला होता.
5 / 17
सावरियां - संजय लीला भन्साळींनी या सिनेमातून सोनम कपूर आणि रणबीर कपूरला लॉन्च केले होते. 40 कोटी रूपये खर्च करून बनवण्यात आलेल्या या सिनेमाने केवळ 36 कोटींची कमाई केली होती.
6 / 17
युवराज - सलमान खान व कतरीना कैफच्या या सिनेमावर 50 कोटींचा खर्च झाला होता. या सिनेमाने कमावले किती तर 16 कोटी.
7 / 17
लव्ह स्टोरी 2050 - या सायन्स फिक्शन सिनेमात प्रियंका चोप्रा व हरमन बावेजा लीड रोलमध्ये होते. 60 कोटी रूपयांचा बजेट असलेल्या या सिनेमाने केवळ 25 कोटींचा बिझनेस केला होता.
8 / 17
चांदनी चौक टू चायना - 2009 साली रिलीज या सिनेमा दीपिका पादुकोण व अक्षय कुमार लीड रोलमध्ये होते. या सिनेमाचा बजेट होता 80 कोटी. सिनेमाने कमावले फक्त 55 कोटी.
9 / 17
काईट्स - हृतिक रोशनच्या काईट्स या सिनेमावर 60 कोटींचा खर्च झाला आणि या सिनेमाने 49 कोटींचा बिझनेस केला होता.
10 / 17
गुजारीश - हृतिक रोशन व ऐश्वर्या रायच्या या सिनेमावर 50 कोटींचा खर्च झाला होता. या सिनेमाने केवळ 29 कोटी कमावले होते.
11 / 17
रा-वन - शाहरूखच्या या सिनेमावर 130 कोटींचा खर्च केला गेला होता. सिनेमाने केवळ 114 कोटींची कमाई केली होती.
12 / 17
बेशरम - 75 कोटी खर्चुन बनवण्यात आलेल्या रणबीर कपूरच्या या सिनेमाने केवळ 59.8 कोटींची कमाई केली होती.
13 / 17
डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी -सुशांत सिंग राजपूतच्या या सिनेमाची रिलीजआधी प्रचंड चर्चा झाली होती. प्रत्यक्षात रिलीज झाल्यावर या सिनेमाने केवळ 26 कोटींचा बिझनेस केला होता.
14 / 17
बॉम्बे वेल्वेट - रणबीर कपूरच्याच या सिनेमावर 120 कोटी रूपये खर्च केले गेलेत. या सिनेमाने कमाई केली ती फक्त 31 कोटी.
15 / 17
ट्युबलाईट - सलमानच्या या सिनेमावर 135 कोटी खर्च झालेत. सिनेमाने कमावले ते 119 कोटी.
16 / 17
ठग्स आॅफ हिंदुस्तान - या सिनेमात आमिर खानसारखा सुपरस्टार होता. सिनेमावर 250 कोटींचा खर्च झाला होता. चित्रपटाने कमावले ते केवळ 151 कोटी.
17 / 17
झिरो- शाहरूखच्या या सिनेमाचा बजेट 200 कोटी होता. प्रत्यक्षात या सिनेमाने केवळ 90 कोटींचा बिझनेस केला.
टॅग्स :बॉलिवूड