Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी किती अन् कशाकशाला नाही म्हणणार?"; भूमी पेडणेकरने सांगितली बॉलिवूडची दुसरी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 20:14 IST

1 / 7
भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी ग्लॅमरपेक्षा भूमिकेला अधिक महत्त्व देते. 'दलदल' या वेब सीरिजमध्ये तिने 'रीटा फरेरा' ही तडफदार पोलिसाची भूमिका साकारली आहे.
2 / 7
भूमीने एका मुलाखतीत सांगितले की, तिला अनेकवेळा मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या, ज्यांचे बजेट ३०० कोटींहून अधिक होते, परंतु तिने त्या नम्रपणे नाकारल्या. त्यामागचे कारण काय हेदेखील तिने स्पष्ट केले आहे.
3 / 7
भूमीने नेहमीच आव्हानात्मक भूमिकांना पसंती दिली आहे. 'दम लगा के हईशा', 'सोनचिरैया' किंवा आताची 'दलदल' असो, तिला अशा कथा हव्या असतात जिथे ती आपल्या अभिनयाची छाप सोडू शकेल.
4 / 7
भूमीने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, 'सुरुवातीच्या काळात मोठ्या बॅनरसोबत काम करणे गरजेचे वाटते, पण आता मात्र मी माझ्या अटी-शर्तींवर भूमिकेची निवड करते आणि चित्रपट निवडते.'
5 / 7
'अभिनेत्रीला केवळ गाण्यापुरते किंवा शो-पीस म्हणून वापरले जाणार असेल तर तशा चित्रपटांचा भाग व्हायचे मला अजिबात इच्छा नाही. केवळ मोठे स्टार्स आहेत म्हणून मी चित्रपट स्वीकारत नाही.'
6 / 7
'मीदेखील ३००-३५० कोटींचे चित्रपट नाकारलेत. पण मी तरी किती आणि कशाकशाला नाही म्हणणार? मलाही घर चालवायचंय आणि माझं करियरही सुरु ठेवायचंय.'
7 / 7
'पण अशा चित्रपटांमध्ये काम करून मला फक्त एक 'हिट' चित्रपट मिळाला असता, पण समाधान मिळाले नसते. म्हणूनच मी असे चित्रपट नाकारते' असे भूमी पेडणेकर हिने स्पष्टपणे सांगितले.
टॅग्स :भूमी पेडणेकर बॉलिवूड