By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 08:00 IST
1 / 10अभिनेता आयुष्यमान खुराणा याचा आज वाढदिवस. 14 सप्टेंबर 1984 रोजी जन्मलेल्या आयुष्यमानचं खरं नाव माहितीये? तर निशांत खुराणा. 2 / 10निशांत खुराणाचा आयुष्यमान खुराणा झाला. आज बॉलिवूडच्या टॉप अॅक्टर्समध्ये त्याचं नाव घेतलं जातं. पण एकेकाळी हाच आयुष्यमान पैशांसाठी रेल्वेत गाणं गायचा.3 / 10कॉलेजच्या दिवसात आयुष्यमान दिल्ली ते मुंबई असा अनेकदा प्रवास करतायचा. यादरम्यान मित्रांसोबत तो रेल्वेच्या प्रत्येक डब्यात गायचा आणि या मोबदल्यात प्रवाशांकडून पैसे घ्यायचा. यातून त्याचा पॉकेटमनी निघायचा.4 / 10आयुषमान हा मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी होता. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुषमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. 5 / 10अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता.6 / 10आयुषमानने एका मुलाखती दरम्यान त्याच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा शेअर केला होता. आयुषमान म्हणाला होता,‘ एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी मला मुंबईला जायला सांगितले. मी हैराण होतो. 7 / 10 सगळं काही ठिक चालू असताना अचानक मुंबईला का जायचंय? असा विचार मनात आला. लोक करिअरसाठी मुंबईत पळून येतात. पण मला माझ्या वडिलांनीच मुंबईला हाकललं होतं. मी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुंबईत निघून आलो आणि त्यादिवसानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही... 8 / 10आयुष्यमानचे वडील एक मोठे ज्योतिषी आहेत. त्यांना मुलाचं भविष्य दिसलं असावं. याच आधारावर त्यांनी आयुष्यमानला मुंबईत पाठवलं होतं. तू आत्ता मुंबईला जाणार नसशील तर नंतर तुला कधीच काम मिळणार नाही, असं ते त्याला म्हणाले होते.9 / 10आयुष्यमान जॉन अब्राहमला गॉडब्रदर मानतो. कारण आयुष्यमानला खरी ओळख देणारा ‘विकी डोनर’ हा सिनेमा जॉनच्या प्रॉडक्शन हाऊसने बनवला होता. जॉनने आयुष्यमानला त्याच्या मनासारखा रोल दिला. यात गाण्याची संधीही दिली.10 / 10लग्न झालं त्यावेळी आयुष्यमानच्या अकाऊंटमध्ये केवळ 10 हजार रूपये होते. आयुष्यमानने 2011 मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी 11 वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े.