'वॉन्टेड' फेम अभिनेत्री पुन्हा ट्रोल, आयेशा टाकियाचा लूक पाहून चाहतेही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:09 IST
1 / 7'वॉन्टेड' फेम अभिनेत्री आयेशा टाकिया (Ayesha Takia) आठवतेय? सलमान खानसोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. 2 / 7आयेशा टाकियाने 'दिल मांगे मोर','यू मी और हम','टार्झन द वंडर कार','संडे','पाठशाला','सोचा ना था','फुल एन फायनल' अशा काही सिनेमांमध्येही भूमिका साकारली.3 / 7२००९ साली आयेशाने फरहान आजमीशी लग्न केलं. फरहान हा समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांचा मुलगा आहे. अशा प्रकारे आयेशा राजकीय कुटुंबाची सून झाली.4 / 7आयेशाने अचानक लग्न केल्याने सर्वांना धक्का बसला. इतकंच नाही तर तिने लग्नानंतर सिनेमांमध्येही कामही केलं नाही. चाहत्यांनी तिला स्क्रीनवर खूप मिस केलं.5 / 7मधल्या काळात आयेशा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. बोटॉक्स, फिलर्स, ओठांचा सर्जरी केल्याने तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं.6 / 7नुकतेच आयेशाने हे सेल्फी पोस्ट केले आहेत. निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तिने फोटो शेअर केलेत. यातही तिचा चेहरा पाहून कमेंट्समध्ये लोक तिला खूप ट्रोल करत आहेत.7 / 7आयेशाने २०१३ साली मुलाला जन्म दिला. त्याचं नाव मिखाइल असं आहे. आता तो १२ वर्षांचा आहे. लेकासोबत ती सोशल मीडियावर अनेक फोटो अपलोड करत अशते.