By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:41 IST
1 / 8संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांची वयाच्या ९३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. आशाताईंच्या निधनाने संगीतक्षेत्राचं मोठं नुकसान झालंय. आशाताईंनी गायलेली गाणी आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात. एक नजर आशाताईंच्या गाजलेल्या गाण्यांवर...2 / 8हिंदीमध्ये आशा भोसले यांनी गायलेली 'दम मारो दम', 'पिया तू अब तो आजा' आणि 'ये मेरा दिल' सारखी कॅबरे गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 3 / 8त्याचबरोबर 'इन आँखों की मस्ती' आणि 'दिल चीज क्या है' सारख्या गझलांमधून त्यांनी आपल्या आवाजातील शास्त्रीय खोली सिद्ध केली आहे. ही गाणीही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात तर कधी डोळ्यांत पाणी.4 / 8याशिवाय अभी ना जाओ छोडकर, अब के बरस भेजो भैय्या, दो लफ्जो की है दिल की कहानी, झुठे तेरे नैन ही गाणी आशाताईंच्या आर्त स्वरांनी सजली. अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये ही गाणी हटकून असतातच.5 / 8आशाताईंची 'बुगडी माझी सांडली गं', 'रेशमाच्या रेघांनी' ही लावणी गाणी आजही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवडीने ऐकली जातात. एकूणच आशाताईंनी भावुक करणाऱ्या गाण्यांसोबत ठसकेबाज लावणी असलेली गाणीही गायली.6 / 8आशाताईंनी मराठीत सुधीर फडकेंसह अनेक गाणी गायली. आभाळ फाटले, जीवलगा राहिले दूर घर माझे, कधी रे येशील तू जीवलगा अशा गाण्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणलं.7 / 8८३ वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी माझं बाळ या सिनेमासाठी आशाताईंनी गायन केलं होतं. आशाताईंनी आजवरच्या कारकीर्दीत तब्बल १२००० गाणी रेकॉर्ड केली असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव समाविष्ट आहे.8 / 8वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही आशाताई संगीत क्षेत्रात सक्रीय होत्या. शेवटपर्यंत त्यांच्या चिरतरुण आवाजातील गोडवा आणि ऊर्जा टिकून होती. आशा भोसले यांच्या निधनाने संगीतक्षेत्राचं न भरुन येणारं नुकसान झालंय.