By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 14:45 IST
1 / 8साऊथचे दिग्गज दिग्दर्शक निर्माते ए. आर. मुरूगदास (A R Murugadoss) लवकरच त्यांच्या ड्रिम प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहेत आणि या सिनेमात एक माकड लीड रोलमध्ये आहे. खास बात म्हणजे या सिनेमात अक्षयचा २० मिनिटांचा कॅमिओ आहे.2 / 8होय, माकडांवरच्या या फॅन्टसी सिनेमात अक्षय कुमार फक्त २० मिनिटांच्या रोलमध्ये दिसणार आहे. मुरूगदास यांच्यासोबत अक्षयने याआधी हॉलिडे या सिनेमात काम केलं आहे.3 / 8गलाटा प्लस या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुद्द मुरूगदास यांनी याबद्दल माहिती दिली. माझ्या या आगामी सिनेमात २० मिनिटांचा हिरोचा रोल आहे आणि हा रोल अक्षय करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.4 / 8खरी बातमी पुढे आहे. होय, मुरूगदास पुढे म्हणाले, मी अक्षयला सिनेमाची स्टोरी ऐकवली आणि त्याने लगेच होकार दिला. मी या सिनेमात फ्रीमध्ये काम करणार. पण मला प्रॉफिट शेअरिंग हवं आहे, असं तो म्हणाला.5 / 8मुरूगदास यांच्या माकडांवरच्या सिनेमात अक्षयने होकार दिला, डील दिली याचा अर्थ हा सिनेमा चांगली कमाई करणार असा विश्वास अक्षयला असणार. कदाचित म्हणूनच त्याने प्रॉफिट शेअरिंग डील दिली असावी.6 / 8ही डिल फायनल झालीच तर २० मिनिटांच्या कॅमिओसाठी सिनेमाच्या नफ्यातील वाटा घेणारा अक्षय बॉलिवूडचा पहिला अभिनेता ठरणार आहे.7 / 8माकडांवरचा हा फँटसी सिनेमा मुरूगदास यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या प्रोजेक्टवर काम करत होते. पण माकडांसोबत शूट करायचा कसं, या प्रश्नामुळे हा प्रोजेक्ट रखडला होता.8 / 8मात्र सरतेशेवटी अव्हेंजर्ससाठी काम करणाऱ्या एका कंपनीने त्यांची ही अडचण सोडली. या कंपनीने स्पेशल इफेक्टसाठी अनेक अवार्ड जिंकले आहेत. सध्या या सिनेमाच्या प्री प्रॉडक्शनचं काम सुरू आहे.