By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 15:44 IST
1 / 9बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय किक्रेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडले.2 / 9निमित्त होते, क्लिनिक व्हिजिटचे. मुंबईतील वांद्रे येथे या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले. 3 / 9मुलीच्या जन्मानंतर जवळपास 10 दिवसांनी विराट-अनुष्का यांना एकत्र पाहून फोटोग्राफर्सनी गर्दी केली. 4 / 9यावेळी अनुष्काने ब्ल्यू कलरची डेनिम पँट व डेनिम शर्ट कॅरी केला होता. तर विराटने ब्लॅक कलरची पँट व शर्ट घातला होता. दोघांच्या तोंडावर मास्क होता.5 / 9अनुष्का व विराटने फोटोग्राफर्सला जबरदस्त पोज दिल्यात. तसेच त्यांच्या शुभेच्छांचाही स्वीकार केला.6 / 911 जानेवारीला विराट कोहलीने त्यांना मुलगी झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.7 / 9 सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने, सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभारही मानले होते. 8 / 9 मुलीच्या जन्मानंतर विराट-अनुष्काने त्यांची प्रायव्हसी जपण्याबाबतही विनंती केली होती. 9 / 9 मुलीच्या जन्मानंतर विराट कोहली याने आपल्या ट्विटरचा बायो बदलला आहे. एक गौरवशाली पती आणि पिता असे त्याने आपल्या बायोमध्ये म्हटले आहे. विराटचा हा नवा बायो चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. तसेच त्यासाठी विराटचे कौतुकही होत आहे.