Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाची ६९ वर्षे पूर्ण... फक्त 'या' ३ सवयींमुळे अनिल कपूर आजही दिसतात तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:38 IST

1 / 10
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक अनिल कपूर. काल त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. अनिल कपूर यांनी वयाची ६९ वर्षे पूर्ण केली आहेत. पण त्यांना पाहून कोणालाही त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे कठीण जाते.
2 / 10
६९ व्या वर्षीही त्यांचा तोच हॉट अंदाज, तीच ऊर्जा आणि देखणेपणा कायम आहे. आजच्या तरुण पिढीसाठीही अनिल कपूर एक 'फिटनेस आयकॉन' बनले आहेत. त्यांच्या या चिरतरुण दिसण्यामागे नेमकं काय रहस्य आहे, असा प्रश्न कायम त्यांच्या चाहत्यांना पडत असतो.
3 / 10
आजच्या काळात जिथे विशीतली मुलं थकतात, तिथे अनिल कपूर ६९ व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने काम करत आहेत. तर त्यांच्या या 'झक्कास' फिटनेसचं सर्वात मोठं गुपित म्हणजे त्यांचा आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली आहे.
4 / 10
अनिल कपूर यांच्या वर्कआउटची सुरुवात रोज पहाटे ६ वाजता होते. 'पिंकव्हिला'च्या वृत्तानुसार, त्यांच्या दिनचर्येत कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि फंक्शनल ट्रेनिंगचा समावेश असतो. ते कधीही आपला व्यायामाचा वेळ चुकवत नाहीत.
5 / 10
अनिल यांनी एकदा चक्क ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावतानाचा फोटो शेअर केला होता.
6 / 10
अनिल कपूर यांचा असा विश्वास आहे की, व्यायामापेक्षा योग्य आहार शरीरासाठी जास्त महत्त्वाचा असतो. ते रिकाम्या पोटी पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
7 / 10
अनिल यांच्या नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त सँडविच, स्मूदी, ओट्स आणि मोड आलेल्या धान्यांचा समावेश असतो. ज्यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते.
8 / 10
दुपारच्या जेवणात ते अतिशय हलका पण पौष्टिक आहार घेतात, ज्यामध्ये वाफवलेली ब्रोकोली, सेलेरी आणि वेगवेगळ्या चविष्ट सॉससह तयार केलेले हेल्दी सॅलड असते.
9 / 10
अनिल कपूर यांच्या मते, 'अन्न हे केवळ जिभेच्या चवीसाठी नसावे, तर ते तुमच्या शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी असावे'. याच विचारामुळे त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षीही स्वतःला पूर्णपणे फिट ठेवले आहे.
10 / 10
अनिल कपूर दररोज नियमित ७ तास झोप घेतात. एकाग्रता वाढवण्यासाठी ते डार्ट्स खेळतात. डार्ट्स खेळल्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते, ऊर्जा मिळते, असे त्यांना वाटते
टॅग्स :अनिल कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी