1 / 7बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अमरीश पुरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. अमरीश पुरी यांची मुलगी काय करते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत2 / 7अमरीश पुरी यांना दोन मुलं असून त्यांच्या मुलाचं नाव आहे राजीव पुरी आणि मुलीचं नाव आहे नम्रता पुरी. अमरीश यांची दोन्ही मुलं मनोरंजन विश्वापासून दूर आहेत3 / 7अमरीश पुरी यांची मुलगी नम्रताने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं पण अभिनयात नव्हे तर फॅशन इंडस्ट्रीत. नम्रताने फॅशन डिझायनिंग इंडस्ट्रीत तिचं नाव कमावलं आहे4 / 7२० ऑगस्ट १९८३ नम्रता पुरीचा मुंंबईत जन्म झाला. तिने शिरीष बागवे यांच्याशी विवाह केला असून, सध्या ती आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहेत.5 / 7नम्रताचे सोशल मीडियावर १२ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत. आपल्या सोशल मीडिया पेजवर नम्रता विविध फॅशन डिझायनिंगच्या पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.6 / 7इतकंच नव्हे तर फॅशन डिझायनर म्हणून नम्रता पुरीने 'Namrata Puri Bespoke' नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे. या ब्रँडला ग्राहक उत्तम प्रतिसाद देताना दिसतात.7 / 7अमरीश पुरी यांच्या अभिनय कारकीर्दीप्रमाणेच नम्रता पुरीने फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. फॅशन जगतात येणाऱ्या नवोदितांसाठी नम्रताचा प्रवास प्रेरणादायी आहे