पडद्यावर खलनायक गाजवणाऱ्या अमरीश पुरींच्या लेकीला पाहिलंत? दिसते फारच सुंदर, मराठी मुलासोबत थाटलाय संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:24 IST
1 / 8हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक साकारुन चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे एकमेव अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. त्यांचा साधेपणा, कामातील वक्तशीरपणा, फिल्मी दुनियेत राहूनही ते अतिशय शिस्तबद्ध आणि नातेसंबंध जपणारे दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आज १२ जानेवारी रोजी अमरीश पुरी यांचा स्मृतीदिवस.2 / 8 ‘मिस्टर . इंडिया’मधील ‘मोगॅम्बो’ असो, वा ‘घातक’मधील ‘शंभू नाथ’ किंवा ‘डीडीएलजी’मधील ‘बाबूजी’ असो अभिनेते अमरीश पुरी यांनी साकारलेली प्रत्येक भूमिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. 3 / 8अमरीश पुरी यांच्या करिअरची सुरुवात मराठी सिनेमापासून झाली होती. १९६७ सालच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती.4 / 8याशिवाय अमरीश पुरी यांनी'मिस्टर इंडिया' मधील 'मोगॅम्बो', 'विधाता' मधील 'जगावर', 'मेरी जंग' मधील 'ठकराल', 'त्रिदेव' मधील 'भुजंग', 'घायल' मधील 'बलवंत राय', 'दामिनी' मधील 'बॅरिस्टर चड्डा', 'करण अर्जुन' मधील 'ठाकूर दुर्जन सिंग' अशा एकूण ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 5 / 8 अमरीश पुरी त्यांच्या काळात खूप लोकप्रिय होते. मात्र, त्यांची लाडकी मुलगी प्रसिद्धीपासून दूर राहते. 6 / 8 अमरीश पुरी यांची मुलगी नम्रताने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं.मात्र, तिने अभिनयात नाहीतर वेगळं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात ती स्थिरावली आहे. नम्रताने अभिनय नाहीतर फॅशन इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. 7 / 8 नम्रता विवाहित आहे. तिचा मराठी मुलगा शिरीष बागवेसोबत लग्न केलं आहे. सध्या ती आपल्या संसारात रमली आहे.नम्रता पुरीने तिच्या वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये काम केलं नाही.8 / 8पण, सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते.नम्रता ४१ वर्षांची आहे, पण या वयातही तिचे सौंदर्य आणि फिटनेस वाखाणण्याजोगा आहे.