Join us  

अमिताभ बच्चन यांच्या 'सरकार 3'चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2017 4:30 AM

राम गोपाल वर्माच्या सरकार 3 चे ट्रेलर नुकतेच मुंबईत लाँच करण्यात आले यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम याठिकाणी उपस्थित होती. सरकार आणि 'सरकार राज'ला मिळालेल्या यशानंतर 'सरकार 3' या चित्रपटाचा प्रतिक्षा प्रेक्षकांमध्ये होती.

राम गोपाल वर्माच्या सरकार 3 चे ट्रेलर नुकतेच मुंबईत लाँच करण्यात आले यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम याठिकाणी उपस्थित होती. सरकार आणि 'सरकार राज'ला मिळालेल्या यशानंतर 'सरकार 3' या चित्रपटाचा प्रतिक्षा प्रेक्षकांमध्ये होती. 7 एप्रिल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सरकार 3' ची टीम ही उत्सुक दिसली.अमिताभ बच्चन यांना पाहून जॅकी श्रॉफला आनंद झाला त्यांने अमिताभ यांना येऊन आलिंगन दिले आणि मीडियाच्या क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.अमिताभ बच्चन आणि जॅकी श्रॉफ यांच्या गप्पा देखील यावेळी रंगल्या होत्या.अमिताभ बच्चन हे शिवाजी नागरेच्या अर्थात सरकारच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये त्यांचा चेहरा जास्त रागात दिसतोय.बिग बींच्या चाहत्यांनी यावेळी त्यांना एक स्केच गिफ्ट म्हणून दिले.काबीलमध्ये नेत्रहिन व्यक्तीची भूमिका साकारणारी यामी गौतम आपल्याया या चित्रपटात एक वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.रनिंग शादी या चित्रपटात सरळ साधा प्रेमी दिसणारा अमित साध सरकार 3मध्ये शिवाजी नागरेच्या गंभीर भूमिकेत दिसणार आहे