आता ‘अलेक्सा’ला अमिताभ बच्चन यांचा आवाज; ‘बच्चन अलेक्सा’ ऐकवणार जोक्स, कविता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 18:19 IST
1 / 11देवीयो और सज्जनो... हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचा. आता महानायकाचा आवाज अॅमेझॉन अॅलेक्सावर ऐकायला मिळणार आहे.2 / 11अॅलेक्साची आवाज बनून महानायक अमिताभ यांचा आवाज देशभर ऐकला जाणार आहे.3 / 11बच्चन अलेक्सा असे या नविन फीचरचे नाव ठेवण्यात आले आहे.4 / 11अॅमेझॉनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत अमिताभ अॅलेक्सा या फीचरला आपला आवाज देणार आहेत.5 / 11 अॅमेझॉनच्या व्हॉइस असिस्टंट सर्व्हिसने अॅमेझॉन अलेक्सासाठी पहिल्यांदाच भारतीय कलाकाराच्या आवाजाची निवड केली आहे.6 / 11बच्चन अलेक्सा तुम्हाला जोक्स, हवामानाचा अंदाज, सल्ला, शायरी, कविता असे सगळे काही ऐकवणार आहे.7 / 11बच्चन अलेक्साशी बोलण्यासाठी तुम्हाला केवळ ‘अलेक्सा, से हॅलो टू मिस्टर अमिताभ बच्चन’, केवळ एवढे एक वाक्य म्हणावे लागेल.8 / 11 बच्चन अलेक्सा 2021 पासून ग्राहकांना वापरता येणार आहे. अर्थात यासाठी ग्राहकांना काही रक्कम भरावी लागणार आहे. 9 / 11साहजिकच अमिताभ या नव्या प्रयोगासाठी प्रचंड उत्सुक आहेत. तंत्रज्ञानाने मला नेहमीच नवीन गोष्टींसोबत जोडण्याची संधी दिली आहे आहे. मी या नव्या तंत्राला माझा आवाज देण्यासाठी खूप उत्सुक आहे. या तंत्राच्या मदतीने मी माझ्या प्रेक्षकांच्या आणखी जवळ येऊ शकेल, असे अमिताभ यांनी म्हटले आहे.10 / 11 अमिताभ बच्चन यांना त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या दमदार आवाजासाठी ओळखले जाते.11 / 11या आवाजाच्या जोरावरच ‘कौन बनेगा करोडपती’ हा त्यांचा शो इतका लोकप्रिय झाला.