1 / 7आलिया भट ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री. आलिया सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये सहभागी झाली आहे. आलिया तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कान्सचं रेड कार्पेट गाजवत आहे. अशातच कान्सच्या मंचावर आलियाने तिच्या सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे.2 / 7कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर झळकल्यानंतर आलियाने एक मुलाखत दिली. यात तिने तिच्या ग्लोईंग स्किनचं रहस्य सांगितलं. कोणतेही महागडे प्रॉडक्ट्स न वापरता आलिया घरच्या घरीच एक असा पदार्थ बनवते जो तिच्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे.3 / 7आलिया म्हणाली की, तिच्या घरी शुद्ध तुपात जेवण बनवले जाते. तुप हे पचनसंस्थेला चांगलं असतं असं तिचं म्हणणं आहे. याशिवाय तूपात आलिया असे पदार्थ मिक्स करते जे तिचा चेहरा उजळ व्हायला मदत करतात.4 / 7आलिया रोज थोडंसं तुप घेते आणि त्यात थोडासा गूळ, बारीक कुटलेले शेंगदाणे, नारळाचा किस हे एकत्र करते. हे मिश्रण एकजीव करुन आलिया ते खाते. यामुळे तिच्या चेहऱ्याला बराच फायदा झाला आहे, असं तिने कबूल केलं.5 / 7आलियाच्या मते, हा एक पौष्टिक 'स्किन स्नॅक' असून ती याचे नियमित सेवन करते. तिने असेही नमूद केले की, हा घरगुती उपाय तिच्या त्वचेवर खरोखरच सकारात्मक परिणाम करतो आणि त्वचेचा उजळपणा टिकवून ठेवण्यास मदत करतो.6 / 7आलिया भट सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये सहभागी झाली आहे. विविध ग्लॅमरस अंदाजात आलियाने फोटोशूट करुन जगभरातील लोकांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे.7 / 7आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची आपल्याला जिगरा या सिनेमात दिसली होती. आता लव्ह अँड वॉर आणि अल्फा या आगामी बिग बजेट सिनेमांमध्ये आलिया झळकणार आहे