By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:40 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती. पण, त्यामुळेच तिने अंगद बेदीशी लग्न करण्यास होकार दिला. 2 / 7नेहा धुपियाने १० मे २०१८ रोजी अंगद बेदीशी लग्न केलं. त्यानंतर काही महिन्यांतच नोव्हेंबरमध्ये तिने मेहेर या त्यांच्या मुलीला जन्म दिला. 3 / 7नेहा धुपियाप्रमाणेच आलिया भट्टही लग्नाआधी गरोदर असल्याच्या चर्चा होत्या. रणबीरशी लग्न केल्यानंतर आलियाने ७ महिन्यांतच राहाला जन्म दिला होता. 4 / 7बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने जून १९९६मध्ये बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांना जान्हवी कपूर ही मुलगी झाली. बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं तेव्हा श्रीदेवी गरोदर होती, अशी चर्चा होती. 5 / 7अभिनेता रणवीर शौरीशी लग्न केलं तेव्हा कोंकणा सेन शर्मा गरोदर होती. त्यांना एक मुलगा आहे. मात्र १० वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. 6 / 7बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोविचने लॉकडाऊनमध्ये हार्दिक पांड्यासोबत लग्न केलं होतं. तेव्हा ती गरोदर होती. गेल्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना अगस्त्य हा मुलगा आहे. 7 / 7नीना गुप्ता यांच्या प्रेग्नंसीची प्रचंड चर्चा होती. विवियन रिचर्डसोबत त्यांचं रिलेशनशिप होतं. लग्न न करताच त्यांनी मसाबाला जन्म दिला आणि तिचा सांभाळ केला.