Cuteness Alert! आतापेक्षा बालपणी जास्त क्यूट होती आलिया, फोटो बघून पुन्हा पुन्हा पडाल तिच्या प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 11:19 IST
1 / 9सध्या अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अचानक लोक तिच्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सर्च करू लागले आहेत. आलिया सध्याची सर्वात क्यूट अभिनेत्री मानली जाते. पण अनेकांना माहीत नसेल की ती जेवढी आता क्यूट आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त क्यूट ती बालपणी होती.2 / 9बालपणी आलिया किती निरागस, क्यूट दिसत होती हे दाखवण्यासाठी आम्ही तिचे तुम्ही न पाहिलेले फोटो घेऊन आलो आहोत. 3 / 9आलिया सध्याची बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. फार कमी वयात तिने खूप जास्त यश मिळवलं आहे. ती तिच्या वडिलांपेक्षा आईच्या जास्त जवळ आहे. इतकंच नाही तर पहिल्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी आई सोनी हीच आलियाला करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये घेऊन गेली होती.4 / 9आलिया भट्ट आणि तिचे वडील महेश भट्ट यांची बॉन्डींग फार चांगली आहे. महेश भट्ट आलियाला खूप टॅलेंटेड मानतात. एका मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले होते की, आलियाने भट्ट परिवाराचं नाव रोशन केलं आहे.5 / 9प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या घरी १५ मार्च १९९३ ला आलियाचा जन्म झाला होता. आलियाचा जन्म ब्रिटनमध्ये झाला होता. कारण तिची आई ब्रिटनची आहे.6 / 9आलियाला बालपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे तिने जास्त शिक्षण घेतलंच नाही. ती केवळ १२वी पर्यंत शिकली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आलियाला इंडस्ट्रीत मोठं करण्यासाठी महेश भट्ट यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही. ती स्वत:च्या मेहनतीने आज या ठिकाणी आहे.7 / 9आलियाने वयाच्या सहाव्या वर्षापासून सिनेमात काम केलं. आज ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. 'संघर्ष' सिनेमात तिने प्रीति झिंटाच्या बालपणीची भूमिका केली होती.8 / 9आलिया भट्टने अभिनेत्री म्हणून करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' पासून सुरूवात केली होती. पहिल्या सिनेमापासूनच ती कमालीची लोकप्रिय झाली. ती सिनेमातील केवळ बाहुली म्हणून उभी राहिली नाही तर वेगवेगळ्या भूमिकांमधून तिने तिचं वेगळेपण सिद्ध केलं आहे.9 / 9