By देवेंद्र जाधव | Updated: October 7, 2025 16:48 IST
1 / 7प्रत्येक चाहत्याचं स्वप्न असतं की, त्यांच्या लग्न समारंभाला एखाद्या बॉलिवूड सुपरस्टारने हजेरी लावावी. तुम्हालाही तुमच्या लग्नाला कोणत्या बॉलिवूड सुपरस्टारला बोलवायचं असेल तर त्यांची फी जाणून घ्या2 / 7Siasat.com ने दिलेल्या रिपोर्टनुसार रोमान्स किंग शाहरुख खानला (Shah Rukh Khan) खाजगी कार्यक्रमात बोलवायचं असेल तर तो सुमारे ३ कोटी रुपये फी घेतो. 3 / 7काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झालेले रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे लग्न समारंभात हजेरी लावण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये फी घेतात.4 / 7अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) खाजगी कार्यक्रमातील उपस्थितीसाठी २ कोटी रुपये घेतो. त्याची पत्नी, अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही यासाठी १.५ कोटी रुपये इतकी फी घेते.5 / 7बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये सर्वात तगडं मानधन घेते ती म्हणजे कतरिना कैफ. कतरिना कैफ कोणत्याही सोहळ्याला हजेरी लावायची असेल तर तब्बल ३.५ कोटी रुपये आकारते.6 / 7हृतिक रोशन देखील खाजगी समारंभात डान्स परफॉर्मन्ससाठी २.५ कोटी रुपये घेतो, तर भाईजान सलमान खानची फी २ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.7 / 7आपल्या दमदार अभिनयासाठी आणि एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) एका लग्नात परफॉर्म करण्यासाठी २.५ कोटी रुपये चार्ज करतो.