रात्री जेवताना फक्त 'ही' एक गोष्ट करा आणि फरक बघा! ५७ वर्षांच्या अक्षय कुमारने सांगितलं फिटनेस रहस्य
By देवेंद्र जाधव | Updated: August 22, 2025 10:28 IST
1 / 7अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षय आता ५७ वर्षांचा आहे पण आजही तो फिट अँड फाईन आहे. अक्षयने त्याच्या फिटनेसचं सीक्रेट सर्वांना सांगितलं आहे.2 / 7अक्षय कुमार शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असेल तरीही दररोज रात्री १० ला झोपायचा प्रयत्न करतो. याशिवाय संध्याकाळी सातच्या आत अक्षय जेवतो. 3 / 7 ‘युअर बॉडी ऑलरेडी नोज' या कार्यक्रमात अक्षयने फिटनेससाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, 'रात्रीचं जेवण लवकर केलंच पाहिजे. हे तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं.' असं तो म्हणाला4 / 7रात्री आपलं शरीर आराम करतं. आपले पायही, हात सर्व अवयव रात्री थकलेले असतात. त्यामुळे रात्री पोटालाही आराम देणं गरजेचं आहे, असं अक्षय म्हणाला.5 / 7याशिवाय मी आठवड्यातलं शेवटचं मील रविवारी खातो. सोमवारी उपवास करतो. त्यानंतर मंगळवार सकाळपर्यंत मी काही खात नाही, असं अक्षय म्हणाला.6 / 7मी फिट राहण्यासाठी कोणतंही वजन उचलत नाही. मी भरपूर खेळतो. ट्रेकला जातो. माझ्या जीममध्ये कोणतंही वजन ठेवलं गेलं नाही. मी तिथे फक्त लटकत असतो.7 / 7अशाप्रकारे जास्तीत जास्त शारीरिक हालचाली करुन अक्षय कुमार स्वतःला फिट ठेवतो. फिट राहण्यासाठी जिममध्ये जाऊन वजन उचलायची गरज नाही, असं अक्षय म्हणाला