Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! अक्षय खन्ना 'या' बॉलिवूड सिनेमात चक्क मराठी बोललाय; पाहून थक्कच व्हाल

By देवेंद्र जाधव | Updated: December 15, 2025 14:42 IST

1 / 7
'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैत या खलनायकी भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय. अक्षय खन्नाने 'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका साकारल्यानंतर 'धुरंधर'च्या रहमान डकैतच्या भूमिकेतही सर्वांचं मन जिंकलंय.
2 / 7
अक्षय खन्ना किती ताकदीचा अभिनेता आहे हे आपल्याला माहितच आहे. अक्षय खन्ना सध्या हिंदीसह साऊथमध्येही काम करतोय.
3 / 7
अशातच एका सिनेमात अक्षय खन्ना चक्क मराठी भाषेत बोलताना दिसत आहे. अक्षय खन्नाच्या तोंडून मराठी ऐकणं हा एक सुखद धक्का आहे
4 / 7
अक्षय खन्ना आणि रिचा चढ्ढा यांची भूमिका असलेला 'सेक्शन ३७५' हा सिनेमा २०१९ साली रिलीज झाला होता. या सिनेमातील एका प्रसंगात अक्षय मराठी बोलताना दिसतोय.
5 / 7
'सेक्शन ३७५' सिनेमात किशोर कदम, विभावरी देशपांडे हे मराठी कलाकार आहेत. या सिनेमात कॉश्च्यमु डिझायनर म्हणून काम करणाऱ्या काम करणारी एक मराठी मुलगी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एका दिग्दर्शकाविरोधात बलात्काराची तक्रार करते.
6 / 7
बलात्काराचं हे प्रकरण हाताळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत श्रीकांत यादव दिसतात. न्यायाधीशांशी बोलताना श्रीकांत अचानक मराठीत बोलू लागतात. तेव्हा वकीलाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्ना सुद्धा मराठीत बोलताना दिसतो.
7 / 7
''तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये काय करत होता?'' असा प्रश्न अक्षय त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारतो. वकीलाच्या भूमिकेतील अक्षय पोलीस अधिकाऱ्याशी मराठीत बोलतो. 'धुरंधर' फेम अक्षयला मराठी बोलताना पाहणं एक सुखद अनुभव आहे. 'सेक्शन ३७५' हा सिनेमा प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
टॅग्स :अक्षय खन्नारिचा चड्डासेक्शन ३७५रणवीर सिंगधुरंधर सिनेमा