'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:44 IST
1 / 10सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे. 'माय फ्रेंड गणेशा' या हिंदी चित्रपटात बाप्पाचे बालगणेश हे लोभसवाणे रूप दाखवण्यात आले.2 / 10'माय फ्रेंड गणेशा'मधील बाप्पाचा मित्र असलेल्या बालकलाकाराचे कौतुक झाले होते. तो लहान मुलगा आता मोठा झाला असून खऱ्या आयुष्यात ती एक मुलगी आहे.3 / 10या तरुणीने नाव अहसास चन्ना असून ती एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने अभिनयाच्या कारकिर्दीला खूप लहान वयातच सुरूवात केली होती.4 / 10तिने 'माय फ्रेंड गणेशा' मध्ये आशुची भूमिका साकारली. याशिवाय तिने त्याच काळात इतरही अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार मुलाची भूमिका साकारली होती.5 / 10सध्या मात्र एहसास चन्ना उदयोन्मुख अभिनेत्री म्हणून चर्चेत येत आहे. अनेक चित्रपटांमध्ये दिसणारी ती तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेचा विषय झाल्याचे दिसते.6 / 10बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून एहसासने इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 'वास्तूशास्त्र'मधून तिची सुरूवात झाली.7 / 10त्यानंतर तिने 'कभी अलविदा न कहना', 'माय फ्रेंड गणेशा', यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. या सर्व भूमिका मुलीच्या नसून मुलाच्या होत्या.8 / 10मुलाच्या भूमिका का साकारल्या? याबद्दलही तिने एकदा खुलासा केला आहे. ती म्हणते, 'मुलाच्या भूमिका मी जाणीवपूर्वक केल्या नव्हत्या तर मला मिळाल्या होत्या.'9 / 10'परिस्थितीमुळे मला त्या भूमिका कराव्या लागल्या. चार वर्षांची असताना मला 'वास्तूशास्त्र'मधली भूमिका मिळाली आणि तिथून पुढे मुलाच्या भूमिकाच येत गेल्या.'10 / 10वय वाढल्यानंतर एहसासने अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याच्या जोरावर ग्लॅमरस भूमिका मिळवल्या. ओटीटीवरील 'कोटा फॅक्टरी','हाफ सीए', 'मिस्ड मॅच'मधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.