Join us  

सहा अभिनेत्यांसोबत अफेअर, एकाशी ९ वर्षे लिव्ह इन, अखेर ४ वर्षे लहानासोबत केलं लग्न, बिपाशाची अजब लव्ह लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 2:07 PM

1 / 6
दिल्लीत जन्मलेल्या आणि कोलकात्यामध्ये लहानाची मोठी झालेल्या बिपाशा बासू हिने एक फॅशन मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिला पदार्पणातच बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
2 / 6
बिपाशा २००२ मध्ये राज या हॉरर चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. या चित्रपटामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. बिपाशा बासू ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या लव्ह लाइफमुळेही खूप चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिचं सहा जणांसोबत अफेअर राहिलं होतं. अखेर तिने २०१६ मध्ये दोन पत्नींना घटस्फोट देणाऱ्या तिच्यापेक्षा ४ वर्षे लहान अभिनेता करणसिंह ग्रोवरसोबत लग्न केलं होतं.
3 / 6
बिपाशा बासू जेव्हा मॉडेलिंग करायची तेव्हा तिची ओळख मिलिंद सोमण याच्याशी झाली. तेव्हा मिलिंद प्रसिद्ध सुपर मॉडेल होता. त्यादरम्यान हे दोघेही जवळ आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार मिलिंद सोमणच बिपाशाचा पहिला बॉयफ्रेंड होता. मात्र हे नातं फार दिवस चाललं नाही.
4 / 6
त्यानंतर २००२ मध्ये बिपाशा बासू राज चित्रपटामध्ये डिनो मोरियासोबत दिसली. या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच त्यांचं अफेअर सुरू झालं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. राज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर बिपाशाच्या जीवनात आणखी एका अभिनेत्याची एंट्री झाली. त्याचं नाव होतं जॉन अब्राहम.
5 / 6
जॉनबाबत बिपाशा खूप सिरीयस होती. तसेच दोघांनीही एकमेकांना जवळपास ९ वर्षे डेट केलं. तसेच ते लिव्ह इनमध्येही होते. बिपाशा जॉनकडे लग्नासाठी आग्रह धरत होती. मात्र तेव्हा जॉनला लग्न करायचं नव्हतं. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. पुढे २०११ मध्ये बिपाशा आणि राणा दग्गुबती यांचा दम मारो दम चित्रपट प्रदर्शित झालाय त्यानंतर या दोघांमधील अफेअरची चर्चा सुरू झावी होती. मात्र हे नातंही लवकरच संपलं. तेव्हा राणाने बिपाशाला चीट केलं असं बोललं जातं.
6 / 6
राणा दग्गुबाती याच्यानंतर बिपाशाचं नाव सैफ अली खान आणि हरमन बावेजा यांच्यासोबतही जोडलं गेलं. मात्र सहा अभिनेत्यांसोबत अफेअरनंतर बिपाशाने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केलं. तो तिच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान आहे. सोबतच बिपाशासोबत लग्न करण्यापूर्वी त्याची दोन लग्न मोडली आहेत. दरम्यान, २०२२ मध्ये १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी एका कन्येचं आगमन झालं.
टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हरबॉलिवूडजॉन अब्राहम