Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरोपेक्षा जास्त मानधन घ्यायची 'ही' मराठमोळी अभिनेत्री, एका चुकीने करिअरच संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:44 IST

1 / 8
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कधीकाळी हिरोंपेक्षाही जास्त मानधन घ्यायच्या. मात्र नंतर संसारात व्यस्त झाल्यामुळे त्या एकाएकी गायब झाल्या.
2 / 8
पण यांच्यात एक अशी अभिनेत्री आहे जिच्या एका चुकीमुळे तिचं प्रोफेशनल आयुष्य धोक्यात आलं. कोण आहे ती वाचा.
3 / 8
ही अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar). 'रंगीला', 'सत्या', 'भूत' अशा एकापेक्षा एक सिनेमांमध्ये ती झळकली. आपल्या सौंदर्याने तर तिने सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं.
4 / 8
उर्मिलाने वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून ती काही सिनेमांमध्ये दिसली. मात्र नंतर तिची एक चूक तिला महागात पडली.
5 / 8
करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना उर्मिला दिग्दर्शक राम गोपाल वर्मांच्या प्रेमात पडली. ती केवळ त्यांचेच सिनेमे करायची. तेही तिच्या प्रेमात होते त्यामुळे ते तिलाच मुख्य भूमिकेत घ्यायचे.
6 / 8
मात्र यामुळे झालं असं की इतर दिग्दर्शक-निर्मात्यांनी उर्मिलाकडे पाठ फिरवली. याचा तिच्या करिअरवर वाईट परिणाम झाला. तिला काम मिळणं बंद झालं. इतकंच नाही तर राम गोपाल वर्मांसोबतचं तिचं नातंही फार काळ टिकलं नाही.
7 / 8
काही दिवसांपूर्वी उर्मिलाने करिअरमध्ये नंतर फ्लॉप झाल्याचं खापर नेपोटिझमवर फोडलं होतं. ती म्हणाली होती की, '९० च्या दशकात माध्यमांना माझ्या कामापेक्षा जास्त माझ्या वैयक्तिक आयुष्यातच जास्त रस असायचा. '
8 / 8
'आज लोक नेपोटिझमवर खुलेपणाने बोलत आहेत. त्या काळी माझ्या आसपासही असे कलाकार होते जे फिल्मी कुटुंबातून आले होते. मी मराठी कुटुंबातून आले आणि चांगलं काम करत होते हे अनेकांना पचलं नव्हतं.'
टॅग्स :उर्मिला मातोंडकरबॉलिवूडमराठी अभिनेता