By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:26 IST
1 / 7काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ती दुसऱ्यांदा आई होणार, ही घोषणा केली. आज या अभिनेत्रीने बेबी बंब फ्लॉन्ट करत खास फोटोशूट केलं.2 / 7ही अभिनेत्री आहे सोनम कपूर. सोनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय रॉयल आणि स्टायलिश अंदाजात तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे3 / 7सोनमने केलेल्या या 'मॅटरनिटी स्टाईल'चे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. या लेटेस्ट फोटोशूटसाठी सोनमने संपूर्ण काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे.4 / 7सोनमने काळ्या रंगाच्या हाय-नेक क्रॉप टॉपसोबत एक लांब पेन्सिल स्कर्ट आणि वरून मॅचिंग ब्लेझर स्टाईल केला आहे. तिचा हा लूक तिची बहीण आणि प्रसिद्ध स्टायलिस्ट रिया कपूर हिने तयार केला आहे.5 / 7या ड्रेससोबत सोनमने डायमंड पेंडंट, कमरेला नाजूक चैन आणि काळ्या रंगाची 'हर्मेस' (Hermès) बॅग कॅरी केली असून तिचा हा ग्लॅमरस अवतार पाहण्यासारखा आहे.6 / 7: हे फोटो शेअर करताना सोनमने 'मम्मा डे आउट' असे कॅप्शन दिले आहे. सोनमच्या या फोटोंवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.7 / 7सोनमची जवळची मैत्रीण स्वरा भास्कर, मृणाल ठाकूर आणि चाची महीप कपूर यांनी या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले आहे