आई रंभा तर मुली दिसायला उर्वशी, मेनका! लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकींना पाहिलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:15 IST
1 / 7सलमान खानच्या 'जुडवा' सिनेमात झळकलेली अभिनेत्री रंभा (Rambha) आठवतेय? करिश्मा कपूरच्या जोडीला ती मुख्य अभिनेत्री होती. 2 / 7रंभाने तमिळ, तेलुगु, मल्याळम, भोजपुरी आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये काम करत अभिनयाचा ठसा उमटवला होता. तिने आपल्या सौंदर्याने सर्वांना प्रेमात पाडलं होतं.3 / 7 २०१० मध्ये रंभाने तमिळ व्यावसायिक इंद्रकुमार पद्मनाथन यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर ती परदेशात स्थायिक झाली. रंभा आज ४९ वर्षांची असून तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे.4 / 7रंभाप्रमाणेच तिच्या दोन्ही मुलीही दिसायला काही कमी सुंदर नाहीत. दोघीही सध्या लहान आहेत. 5 / 7२०१२ मध्ये तिने पहिल्या मुलीला जन्म दिला. तिचं नाव लावण्या आहे. रंभाची थोरली लेक लावण्या दिसायला आईसारखीच सुंदर आहे. ती १३ वर्षांची आहे.6 / 7तर रंभाची धाकटी लेक साशा ही १० वर्षांची आहे. रंभाने आपल्या दोन्ही मुलींसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. 7 / 7तसंच तिला एक मुलगाही आहे. २०१८ मध्ये तिने शिविनला जन्म दिला. रंभा कुटुंबासोबत टोरंटोमध्ये वास्तव्यास आहे. रंभी मधल्या काही काळात टीव्ही शोमध्ये परीक्षक म्हणून दिसली.