Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षातून दोन वेळा नऊ दिवसांचा उपवास, हनुमान चालिसाही म्हणते; 'या' मुस्लिम अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 10:05 IST

1 / 8
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी वेगळ्या धर्माचे असूनही इतर धर्मांच्या रितींचं पालन करतात. विशेषत: मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेले सेलिब्रिटी हिंदू धर्मातील परंपरा पाळतात.
2 / 8
अशीच एक अभिनेत्री जी वर्षातून दोन वेळा उपवास करते. शिवाय मला हनुमान चालिसा म्हटल्याने शांती मिळते अशीही तिने प्रतिक्रिया दिली. कोण आहे ही अभिनेत्री?
3 / 8
ही अभिनेत्री धार्मिक नाही पण अध्यात्मिक आहे. धर्म न बदलताही ची गायत्री मंत्र, हनुमान चालिसाचे पठण करते. यामुळे तिला मन:शांती मिळते. तिचं मूळ पाकिस्तान आहे मात्र ती बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे.
4 / 8
ही अभिनेत्री आहे 'रॉकस्टार' फेम नर्गिस फाखरी (Nargis Fakhri). नर्गिसचे वडील मोहम्मद फाखरी पाकिस्तानी होते. तर आई युरोपियन देशातली होती. नर्गिसचा जन्म न्यूयॉर्क मध्ये झाला. ती ६ वर्षांची असतानाच आई वडिलांचा घटस्फोट झाला.
5 / 8
'न्यूज ९'शी बोलताना ती म्हणाली, 'मी अध्यात्मिक आहे. धार्मिक नाही. मी सर्व धर्मांचं पालन करते. मी अशी व्यक्ती आहे जिच्या घरी गायत्री मंत्री ऐकतात. मला यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळते. मी ख्रिश्चन म्युझिकही ऐकते.'
6 / 8
'मी वर्षातून दोन वेळा उपवास करते. यामध्ये मी ९ दिवस काहीच खात नाही. फक्त पाणी पिते. हे फार कठीण असतं असं केल्याने नंतर माझ्या सौंदर्यातही वाढ होते. त्वचा उजळून येते.'
7 / 8
'कोणत्याही चिंतेपासून दूर राहण्यासाठी मी हनुमान चालिसा म्हणते. मला त्यामुळे छान वाटते. हे मी भारतात येण्याच्याही खूप आधीपासून करत आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही.'
8 / 8
नर्गिस आज ४५ वर्षांची आहे. नुकतीच ती 'हाऊसफुल ५' मध्ये दिसली. नर्गिस ५ वर्ष उदय चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या अफेअरची खूप चर्चाही झाली होती.
टॅग्स :नर्गिस फाकरीबॉलिवूड