Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंसोबत केला रोमान्स, पण अभिनेत्रीला थाटता आला नाही एकासोबतही संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:29 IST

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा सध्या चर्चेत, कारण भारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे. लिएंडर आणि किम शर्मा गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि अनेक प्रसंगी दोघांनीही त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 5
टेनिसस्टार लिएंडर पेस आणि किम शर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याचे वृत्त समोर आले आहे. याआधी पेस संजय दत्तची माजी पत्नी रिया पिल्लईसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता आणि बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीसोबतचे त्याचे अफेअरही चर्चेत होते.
3 / 5
लिएंडरच्या आधी किम शर्माच्या भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. काही वर्षांपूर्वी किम शर्माने तिचा पोल डान्स करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर युवराजनेही कमेंट करत लिहिले, काय धून आहे. कोणते गाणे गाताहेत मॅडम?
4 / 5
युवराज सिंग आणि किम शर्मा बरेच दिवस चर्चेत होते, मात्र हे नाते पुढे वाढू शकले नाही. २००७ ट्वेंटी-२० वर्ल्ड आणि २०११चा वन डे वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगने नंतर बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे.
5 / 5
किम शर्मा २००० मध्ये शाहरुख खानच्या 'मोहब्बतें' या चित्रपटात दिसली होती आणि त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. ती डझनहून अधिक चित्रपटांमध्ये दिसली आहे.
टॅग्स :किम शर्मायुवराज सिंगलिएंडर पेस